Rahul Gandhi : राहुल गांधी यांच्याकडून पंतप्रधान मोदींचा जातीवाचक उल्लेख

312
Rahul Gandhi : राहुल गांधी यांच्याकडून पंतप्रधान मोदींचा जातीवाचक उल्लेख
Rahul Gandhi : राहुल गांधी यांच्याकडून पंतप्रधान मोदींचा जातीवाचक उल्लेख

पंतप्रधान मोदी ‘ओबीसी’ म्हणून जन्मले नाहीत. पंतप्रधान नरेंद्र मोदी (Narendra Modi) यांनी स्वतःच्या जातीबद्दल खोटे सांगितले आहे. ते खुल्या प्रवर्गातील असून ओबीसी प्रवर्गाशी त्यांचा संबंध नाही, अशा शब्दांत काँग्रेस नेते राहुल गांधी (Rahul Gandhi) यांनी पंतप्रधान मोदी यांच्यावर जातीवाचक टीका केली आहे.

गुरुवार, ८ फेब्रुवारी रोजी ओडिशा येथील झरसूगुडा येथे ‘भारत जोडो न्याय यात्रे’त (Bharat Jodo Nyay Yatra) राहुल गांधी बोलत होते. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी अर्थसंकल्पीय अधिवेशनात स्वतःच्या ओबीसी (OBC) प्रवर्गाचा उल्लेख केला होता. या वेळी त्यांनी स्वतःला सर्वांत मोठा ओबीसी असल्याचे म्हटले होते. या खुलाशातून मोदींनी काँग्रेसच्या टीकेला प्रत्युत्तर दिले होते.

(हेही वाचा – Farmer Accident Insurance : गोपीनाथ मुंडे शेतकरी अपघात विमा योजनेसाठी ४८.६३ कोटी रुपये वितरित)

ते ओबीसी प्रवर्गात जन्मलेले नाहीत

राहुल गांधी या प्रकरणी बोलतांना म्हणाले की, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी स्वतःच्या जातीबद्दल चुकीची माहिती पसरवली. पंतप्रधान खुल्या प्रवर्गातील आहेत. ओबीसी प्रवर्गाशी त्यांचा काहीही संबंध नाही. पंतप्रधान नरेंद्र मोदी हे ओबीसी प्रवर्गातील जातीत जन्मलेले नाहीत. त्यांचा जन्म गुजरातच्या ‘तेली’ जातीत झाला आहे. या जातीला भाजपाने २००० साली ओबीसी प्रवर्गात टाकले. त्याआधी तेली जात खुल्या प्रवर्गात होती.

ओबीसी प्रवर्गात जन्मलेले नसल्यामुळे पंतप्रधान मोदी हे खूप आधीपासून जातीनिहाय जनगणनेला विरोध करत आले आहेत. कारण ते खुल्या प्रवर्गाचे प्रतिनिधीत्व करतात, असेही राहुल गांधी यांनी म्हटले आहे.

(हेही वाचा – Chandrashekhar Bawankule : घरेलू कामगारांच्या नोंदणी शुल्कात कपात; चंद्रशेखर बावनकुळेंच्या पाठपुराव्याला यश)

पंतप्रधान मोदी काय म्हणाले होते ?

अर्थसंकल्पीय अधिवेशनात राष्ट्रपतींच्या अभिभाषणाच्या चर्चेला उत्तर देत असताना पंतप्रधान मोदी यांनी कॉंग्रेसच्या ओबीसी धोरणावर टीका केली होती. “काँग्रेसने (Congress) ओबीसी समाजाला कधीही न्याय दिला नाही. या लोकांनी ओबीसी नेत्यांचा अपमान करण्यात कोणतीही कसर सोडली नव्हती. काही दिवसांपूर्वी आम्ही कर्पुरी ठाकूर (Karpuri Thakur) यांना मरणोत्तर ‘भारतरत्न पुरस्कार’ (Bharat Ratna Award) दिला. पण कर्पुरी ठाकूर यांच्याबरोबर काँग्रेसने अतिशय निंदजनक असा व्यवहार केला होता. काँग्रेसला वंचित-मागासवर्गी लोक पुढे आलेले चालत नाहीत.” (Rahul Gandhi)

हेही पहा – 

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.