Daycare Scheme : राज्यात लवकरच पाळणाघर योजना; नोकरदार महिलांना दिलासा

घर सांभाळून नोकरी करणाऱ्या महिलांना राज्य शासनाने दिलासा देण्याचा निर्णय घेतला आहे. राज्यात लवकरच पाळणाघर योजना सुरू केली जाणार असून, तिची जोडणी अंगणवाडीशी केली जाणार आहे.

176
Daycare Scheme : राज्यात लवकरच पाळणाघर योजना; नोकरदार महिलांना दिलासा
Daycare Scheme : राज्यात लवकरच पाळणाघर योजना; नोकरदार महिलांना दिलासा

घर सांभाळून नोकरी करणाऱ्या महिलांना राज्य शासनाने दिलासा देण्याचा निर्णय घेतला आहे. राज्यात लवकरच पाळणाघर योजना सुरू केली जाणार असून, तिची जोडणी अंगणवाडीशी केली जाणार आहे. (Daycare Scheme)

राष्ट्रीय पाळणाघर योजनेचा आढावा घेऊन निर्णय घेण्याबाबत समिती स्थापन करणार असल्याची माहिती महिला व बालविकास मंत्री आदिती तटकरे यांनी मंगळवारी दिली. मंत्रालयातील दालनात केंद्र शासनाद्वारे मान्यता प्राप्त राष्ट्रीय पाळणाघर योजनेतंर्गत दुर्बल घटकातील कामकाजी महिला, पाळणाघर महिला कर्मचारी यांच्याबाबत आयोजित बैठकीत त्या बोलत होत्या. यावेळी महिला व बालविकास विभागाचे सचिव डॉ. अनुपकुमार यादव, ऑल एन. जी. ओ. वेल्फेअर असोसिएशन ऑफ इंडियाचे अध्यक्ष दादाराव डोंगरे यांच्यासह अन्य सदस्य उपस्थित होते. (Daycare Scheme)

तटकरे म्हणाल्या की, राष्ट्रीय पाळणाघर योजनेचा आढावा घेण्यासाठी महिला व बालविकास आयुक्तांच्या अध्यक्षतेखाली समिती नेमण्यात येईल. आतापर्यंत केंद्राकडून आलेले अनुदान व जिल्हा महिला व बालविकास अधिकारी यांनी केलेल्या तसेच त्या कालावधीतील सर्व तपशील तपासून याबाबत सकारात्मक निर्णय घेण्यात येईल. (Daycare Scheme)

(हेही वाचा – Maratha Reservation : ओबीसी आरक्षण रद्द करण्यासाठी मुंबई उच्च न्यायालयात याचिका दाखल)

अंगणवाडीशी जोडणार

जेथे कामगार जास्त आहेत, अशा ग्रामीण भागांत आणि शहरी भागांतही अंगणवाडीला जोडून पाळणाघर सुरू करण्याचे विचाराधीन आहे. केंद्राच्या मार्गदर्शक सूचनाप्रमाणे आणि राज्य शासनाच्या नियमावलीप्रमाणे पाळणाघर सुरू करण्याबाबतही निर्णय घेऊ अशी ग्वाही मंत्री तटकरे यांनी दिली. (Daycare Scheme)

हेही पहा –

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.