लाडक्या बहिणींचा मार्ग सुकर; ई-केवायसीच्या कटकटीतून सुटका; Aditi Tatkare यांनी दिली ‘ही’ मोठी गुड न्यूज

86

महाराष्ट्र शासनाची अत्यंत लोकप्रिय ठरलेली ‘मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजने संदर्भात एक महत्ताची अपडेट समोर आली आहे. या योजनेचा लाभ घेणाऱ्या सुमारे दोन कोटींहून अधिक महिलांसाठी ई-केवायसी (e-KYC) करण्याची अंतिम मुदत ३१ डिसेंबर २०२५ ला संपली आहे. या प्रक्रियेत पारदर्शकता आणण्यासाठी आणि खऱ्या लाभार्थ्यांपर्यंत मदत पोहोचवण्यासाठी सरकारने ई-केवायसी अनिवार्य केली होती. मात्र, मुदत संपल्यानंतरही अनेक महिलांची प्रक्रिया अपूर्ण असल्याने किंवा तांत्रिक चुका झाल्याने आता सरकारने नवीन पाऊल उचलले आहे. (Aditi Tatkare)

(हेही वाचा – भाजपाचे राष्ट्रीय अध्यक्ष झाल्यानंतर Nitin Nabin यांनी स्वीकारला पदभार; दिल्लीत बोलावली पहिली मोठी बैठक)

आदिती तटकरे काय म्हणाल्या?
महिला आणि बालविकास मंत्री आदिती तटकरे यांनी एक्सवर ट्विट करत महत्त्वाची माहिती दिली आहे. “मुख्यमंत्री माझी लाडकी बहिण योजनेबाबत महत्वाची सूचना! महाराष्ट्रातील महिलांच्या आर्थिक सक्षमीकरणासाठी, त्यांच्या आरोग्य व पोषणामध्ये सुधारणा करण्यासाठी मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना राबवण्यात येत आहे. या योजनेच्या प्रभावी अंमलबजावणीसाठी सर्व लाभार्थ्यांना दिनांक ३१ डिसेंबर २०२५ पर्यंत e-KYC करण्याची मुदत देण्यात आली होती. तसेच काही कारणास्तव e-KYC करताना चुकीचा पर्याय निवडण्याची बाब निदर्शनास आली आहे. म्हणूनच, योजनेच्या निकषांनुसार या लाभार्थी महिलांची क्षेत्रीय स्तरावर अंगणवाडी सेविकांमार्फत प्रत्यक्ष पडताळणी (Physical Verification) करण्याच्या सूचना राज्यातील सर्व जिल्हाधिकाऱ्यांना देण्यात आल्या आहेत”, अशी माहिती मंत्री आदिती तटकरे यांनी दिली आहे.

(हेही वाचा – Badlapur Train Accident : तरुणाने मोबाईल लुटीचा विरोध करताच…; नेमकं काय घडलं?)

काही जणांची ई-केवायसीची मुदत वाढवण्याची मागणी
आदिती तटकरे यांनी फेसबुवरही याबाबतची माहिती दिली आहे. त्यांच्या पोस्टवर अनेकांकडून प्रतिक्रिया दिली जात आहे. अनेकांनी ई-केवायसीची मुदत आणखी वाढवण्याची विनंती केली आहे. काही महिलांची ई-केवायसी करताना ओटीपी आला नाही त्यामुळे ई-केवायसी पूर्ण होऊ शकली नाही, अशा महिलांसाठी ई-केवायसीची तारीख वाढवण्यात यावी, अशी विनंती एका युजरने आदिती तटकरे यांच्या फेसबुक पोस्टवर केली आहे. आता या कमेंटचा विचार करुन आदिती तटकरे खरंच अशा महिलांसाठी काही निर्णय घेतात का? ज्या लाडक्या बहिणींची ई-केवायसी राहिली आहे त्यांच्यासाठी मुदत वाढवण्याचा निर्णय घेतात का? ते पाहणं आता महत्त्वाची आहे.

हेही पहा –

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.