Mumbai Metro : मुंबईत दाखल झाली नववी मेट्रो ,लवकरच सुरु होणार ट्रायल रन

या मार्गिकेतील आरे – बीकेसी या पहिल्या टप्प्याचे काम अंतिम टप्प्यात आहे.

146
Mumbai Metro : मुंबईत दाखल झाली नववी मेट्रो ,लवकरच सुरु होणार ट्रायल रन
Mumbai Metro : मुंबईत दाखल झाली नववी मेट्रो ,लवकरच सुरु होणार ट्रायल रन

कुलाबा-वांद्रे-सीप्झ मेट्रो ३ मार्गिकेतील आरे – बीकेसी या पहिल्या टप्प्याच्या संचलनासाठी लागणाऱ्या नऊ मेट्रो गाड्यांमधील शेवटची, नववी मेट्रो गाडी अखेर शुक्रवारी मुंबईत दाखल झाली. आता लवकरच पहिल्या टप्प्या दरम्यान ट्रायल रन सुरु होणार आहे.सीप्झ ते वांद्रे हा पहिला टप्पा वर्षाच्या अखेरीस प्रवाशांच्या सेवेत आणण्याचे कॉर्पोरेशनचे लक्ष्य आहे. (Mumbai Metro)

मुंबई मेट्रो रेल कॉर्पोरेशनकडून (एमएमआरसी) ३३.५ किमीच्या भुयारी मेट्रो मार्गिकेचे कामे सुरू आहे. या मार्गिकेतील आरे – बीकेसी या पहिल्या टप्प्याचे काम अंतिम टप्प्यात आहे. हा टप्पा डिसेंबरअखेरीस वाहतूक सेवेत दाखल करण्याचे एमएमआरसीचे नियोजन आहे. त्यासाठीच आता काही दिवसातच या मार्गिकेवरील विविध चाचण्यांना सुरुवात करून सुरक्षा प्रमाणपत्र मिळविण्या येणार आहे. दुसरीकडे पहिल्या टप्प्यासाठी आवश्यक अशी शेवटची नववी मेट्रो गाडीही शुक्रवारी मुंबईत दाखल झाली आहे.
आंध्र प्रदेशातील श्री सिटी येथील एका कारखान्यात मेट्रो ३ च्या गाड्यांची बांधणी केली जात आहे. पहिल्या टप्प्याच्या संचलनासाठी नऊ मेट्रो गाड्यांची आवश्यकता होती. आता या सर्व नऊ गाड्या मुंबईतील आरे कारशेडमध्ये दाखल झाल्या आहेत. आता लवकरच मुंबईकरांना भुयारी मेट्रोतून प्रवास करत येणार आहे.

(हेही वाचा : Meagablock : मध्य रेल्वेमार्गावर मेगाब्लॉक)

काय होईल फायदा
कॉर्पोरेशनला हा टप्पा वेळेत गाठता आल्यास कोंडीचे विघ्न दूर होणार आहे मुंबई महानगरात ३१४ किलोमीटर मेट्रोच्या निर्माण होणाऱ्या जाळ्यामुळे मुंबईतील ३० ते ४० लाख वाहने कमी होतील. येत्या डिसेंबर-२०२३ अखेरपर्यंत मेट्रो ३ चा टप्पा (आरे ते बीकेसी स्थानक) पूर्ण होईल. दुसरा टप्पा जून-२०२४ पूर्वी पूर्ण केला जाईल. सध्या सुमारे १ कोटी १० लाख नागरिक सार्वजनिक वाहनांनी प्रवास करतात. २०२६ पर्यंत मुंबईतील मेट्रो मार्गांचे काम पूर्ण करण्याचे प्रस्तावित आहे. मुंबई महानगर प्रदेश परिसरात त्यामुळे वर्तुळाकार मेट्रो मार्ग तयार होतील.२०३१ पर्यंत १ कोटी प्रवासी मेट्रोने प्रवास करतील.

हेही पहा –

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.