The kerala Story : कार्यकर्ता कसा असावा, ‘साधू मगर’ सारखा असावा

कार्यकर्ता कोणाला म्हणावे याविषयी सावरकर म्हणतात "जो सैनिक झुंजतो तो वीर आणि जो कार्य करतो तो कार्यकर्ता."

216
  • जयेश शत्रुघ्न मेस्त्री

कार्यकर्ता कोणाला म्हणावे याविषयी सावरकर म्हणतात “जो सैनिक झुंजतो तो वीर आणि जो कार्य करतो तो कार्यकर्ता.” सावरकर स्वतः एक कृतीशील नेता होते. वसंत व्याख्यानमालेसह कृतीमाला सुरु करण्यावर त्यांचा भर होता. मात्र कृती काय करायची असा प्रश्न अनेकांना पडत असतो. सावरकरांनी लहान सहान कृतींना प्राधान्य दिलं आहे. थेंबे थेंबे तळे साचे असं म्हणतात. त्याचप्रमाणे लहान सहान कृतीतून मोठे कार्य उभे राहते. १९२५ ला राष्ट्रीय स्वयंसेवक संघाची पहिली साखा सुरु झाली आणि आज संघाच्या संस्कारातून निर्माण झालेली एक व्यक्ती भारताच्या सर्वोच्च पदावर विराजमान आहे. त्यामुळे लहान कृतींना खूप महत्व असतं.

तसेच कलेच्या माध्यमातून आपले विचार मांडण्यावर देखील सावरकरांनी भर दिला होता. दि काश्मीर फाईल्स या यशस्वी चित्रपटानंतर आता दि केरला स्टोरी हा चित्रपट प्रदर्शित झाला आहे. हा चित्रपट पाहिल्याशिवाय चित्रपटाच्या हेतूबद्दल किंवा गुणवत्तेबद्दल बोलता येणार नाही. मात्र केरळमधील मुलींचे बळजबरीने धर्मांतर करुन त्यांना इस्लामी दहशवतवादी बनवण्यात आले होते, त्या पार्श्वभूमीवर हा चित्रपट निर्माण करण्यात आला आहे. दि काश्मीर फाईल्स हा चित्रपट सामान्य हिंदुंनी यशस्वी करुन दाखवला आहे. चित्रपटगृहातील लोकांच्या प्रतिक्रिया उपलब्ध झाल्या होत्या.

आता दि केरला स्टोरी या चित्रपटाला दाव्या फळीतून मोठ्या प्रमाणात विरोध केला जात आहे. तसेच हिंदुत्ववाद्यांनी या चित्रपटाचे समर्थन केले आहे. सत्य परिस्थिती लोकांना कळणार नाही तोपर्यंत लोक जागृत होणार नाहीत, अशी भूमिका हिंदुत्ववाद्यांची आहे. एखादी समस्या ही समस्याच नाही असे मानले तर आपला घात होऊ सकतो, हे १९४७ रोजी आपण अनुभवले आहे. या चित्रपटावरुन वाद सुरु असतानाच रिक्षाचालक असलेल्या पुण्यातील एका कृतीशील हिंदुत्ववाद्याने दि केरला फाईल्स हा चित्रपट पाहायला जाणार्‍यांसाठी मोफत रिक्षासेवा देणार असल्याचे जाहीर केले आहे. पुणे जिल्ह्यातील आळंदी येथे राहणार्‍या या रिक्षाचालक कार्यकर्त्याचे नाव आहे साधू मगर.

(हेही वाचा byculla zoo : राणीबागेत अनुभवा ‘जय’ आणि ‘रुद्र’ सह डोरा, सिरी, निमो यांचा रुबाब)

साधू मगर यांनी आपल्या रिक्षाच्या मागच्या बाजूला “दि केरला स्टोरी ह्या इत्रपटासाठी आपली रिक्षा मोफत… मोफत.. आहे. आळंदी परिसरातील पहिल्या १० महिलांसाठी मोफत तिकीट.” असे लिहिले आहे. ही किरीट सोमय्या यांनी देखील या तरुणाचे विशेष कौतुक केले आहे. हा तरुण सोशल मीडियावर सक्रिय असतो आणि अनेक लोकांच्या सांगण्यावरुन हा सज्जन गृहस्थ असल्याचे कळले आहे. काहींनी साधू मगर यांच्या या कृतीची स्तुती केली तर काहींनी खिल्ली उडवली. मात्र सावरकरांनी सांगितलेली कृतीशीलता हीच आहे. हे काम अगदी लहान आहे. कदाचित या कामाची तीव्रता आता जाणवणार नाही. मात्र अशाप्रकारची अनेक लहान सहान कामे घडतात त्यातून क्रांती निर्माण होते. “दे दी हमे आझादी, बिना खडग्‌ बिना ढाल.” हे गीत कॉंग्रेसी निर्लज्जपणे गात असतात. त्यांना आधी, त्या दरम्यान  व नंतर केलेल्या क्रांतीकार्याचे कौतुक नसते. कारण सर्व श्रेय त्यांना घ्यायचे असते. बिना खडग्‌ बिना ढाल स्वातंत्र्य मिळवण्यासाठी अनेकांनी आपल्या बाहुचे खडग्‌ केले आणि आपल्या छातीची ढाल केली आहे याचा विसर ह्या क्युट कॉंग्रीसींना पडतो. सांगायचे तात्पर्य प्रत्येक कार्य महत्वाचे आहे.

म्हणूनच साधू मगर यांनी केलेली ही चिमुकली कृती भविष्यात अनेकांना  मार्गदर्शक ठरणार आहे. स्वा. सावरकरांच्या मार्गावरुन चालणारे तरुण आपल्या देशात आहेत, हे आपल्या देशाचे भाग्य. थोडक्यात साधू मगर यांची ही चिमुकली कृती पुढे मगरमिठी ठरली तरी आश्चर्य वाटून घेऊ नका.

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.