BMC : रस्ते प्रकल्प आणि खड्डे दुरुस्ती कामांची माहिती डॅशबोर्डवर

मुंबईतील नागरिकांसाठी सुलभ दळणवळणाच्या अनुषंगाने रस्ते आणि वाहतूक विभागाने शहर आणि उपनगरात वेगवेगळे प्रकल्प हाती घेतले आहेत. राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या निर्देशानुसार रस्त्यांचे सिमेंट काँक्रिटीकरण करण्याची अंमलबजावणी रस्ते विभागाकडून सुरू झाली आहे.

114
मुंबई महानगरपालिकेकडून रस्ते विभागाशी संबंधित प्रकल्पांबाबतची माहिती एकत्रित संकलित करणे तसेच ही माहिती एकत्रपणे  डॅशबोर्डद्वारे उपलब्ध होणार आहे. मुंबईतील रस्त्यांच्या प्रकल्पांची माहिती तसेच रस्त्यांचे खड्डे दुरूस्ती आणि पृष्ठीकरणाची कामे याबाबतची माहिती डॅशबोर्डच्या माध्यमातून वेळोवेळी यंत्रणेला उपलब्ध होणार आहे. प्रकल्पाबाबतची माहिती तसेच अद्ययावत तंत्रज्ञान यंत्रणेला वेळोवेळी अवगत करून देणे देखील अपेक्षित आहे. सध्या पर्जन्य जलवाहिन्या विभागाकडून मुंबईतील नाल्यातून गाळ काढण्याच्या कामाचा डॅशबोर्ड उपलब्ध करून देण्यात आला आहे. त्याच्यामुळे प्रशासनासह सर्वसामान्य नागरिकांना देखील नाल्यांमधून गाळ काढण्याच्या कामांची अद्ययावत माहिती ऑनलाईन पाहता येते.
मुंबईतील नागरिकांसाठी सुलभ दळणवळणाच्या अनुषंगाने रस्ते आणि वाहतूक विभागाने शहर आणि उपनगरात वेगवेगळे प्रकल्प हाती घेतले आहेत. राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या निर्देशानुसार रस्त्यांचे सिमेंट काँक्रिटीकरण करण्याची अंमलबजावणी रस्ते विभागाकडून सुरू झाली आहे. रस्त्यांची निरनिराळी कामे नियोजित वेळेत पूर्ण व्हावीत यासाठी  महानगरपालिका आयुक्त तथा प्रशासक  इकबाल सिंह चहल आणि अतिरिक्त  आयुक्त (प्रकल्प)  पी. वेलरासू यांच्या मार्गदर्शनाखाली रस्ते विभागाकडून सातत्याने प्रयत्न सुरु आहेत. मुंबईत चांगल्या गुणवत्तेचे रस्ते उपलब्ध असावेत, यासाठी उपायुक्त (पायभूत सुविधा)  उल्हास महाले हेही नियमितपणे सर्व प्रकल्पांचा पाठपुरावा करत असतात. माहिती विश्लेषणाच्या या अत्याधुनिक सेवेमुळे प्रशासनाला अत्यंत परिणामकारकपणे व जलदगतीने या कामांना पूर्णत्वाकडे नेण्यासाठी मदतच मिळणार आहे.
महानगरपालिकेच्या रस्ते विभागाकडे संपूर्ण मुंबईत रस्ते कामांच्या अंमलबजावणीची जबाबदारी आहे. या प्रकल्पांमध्ये मोठ्या आणि छोट्या रस्त्यांचे सिमेंट काँक्रिटीकरण (सी.सी), पदपथांचे सुशोभीकरण आणि ठाशीव काँक्रिटीकरण, रस्ते बांधणी कामांचा प्रामुख्याने समावेश असतो. त्यासोबतच रस्त्यांवरील खड्डे बुजविणे आणि रस्त्यांचे पृष्ठीकरणाच्या देखील करण्यात येते. या सर्वच कामांमध्ये कामे सुरु होण्यापूर्वी, कामे सुरु असताना व दायित्व कालावधीत देखील यंत्रणेला मोठ्या प्रमाणात माहिती (डेटा) संकलन करण्याची गरज भासते. तसेच ही माहिती व सांख्यिकी सातत्याने अद्ययावत करुन, विश्लेषण करुन त्याआधारे कामांच्या अंमलबजावणीवर देखरेखही करावी लागते. या कार्यवाहीमध्ये सूसूत्रता व वेग आणण्याच्या दृष्टीने, रस्ते विषयक प्रकल्पांची माहिती संकलन आणि विश्लेषण, अहवाल आदी करण्यासाठी रस्ते विभागामार्फत सल्लागार नेमण्याची प्रक्रिया सुरू झाली आहे. माहिती विश्लेषणातून रस्ते व वाहतूक विभागाची धोरणे आणि निर्णय प्रक्रियेसाठी डॅशबोर्ड, सादरीकरण, अहवाल इत्यादी तयार करणे या बाबी देखील यामधून साध्य करण्यात येणार असल्याचे महानगरपालिका अतिरिक्त आयुक्त (प्रकल्प)  पी वेलरासू यांनी सांगितले.
Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.