Marathi Bhajan : प्रवास आनंददायी आणि निसर्गाचा आनंद घेत करायचाय, मग ‘ही’ १० मराठी भजने ऐकाच

139

आपण एखाद्यावेळी प्रवास करतो तेव्हा आपली मनस्थिती शांत असणे, स्थिर असणे, पावसाचा आनंद घेण्यासारखी असणे ही सगळ्यांचीच अपेक्षा असते, म्हणून मग अनेकजण प्रवासात पुस्तक वाच, गेम खेळ, आता अनेक जण मोबाईलवर रिल्स बघतात, व्हाट्सअप पाहतात, पण यातून प्रवास आनंदायी होण्याची अपेक्षा पूर्ण होईलच ही शक्यता कमीच आहे. त्यासाठी मराठी भजने (Marathi Bhajan) ऐकणे हा पर्याय उत्तम ठरू शकतो.

मराठी भजने मन शांत ठेवतात

प्रवासात मनाची शांतता असावी यासाठी प्रवासात गाणी ऐकणे केव्हाही चांगले आहे, पण मग ही गाणी कोणती असावीत, प्रवासात असताना साहजिकच निसर्गाचा आनंद घ्यायचा असतो, अशा वेळी डिस्कोची गाणी, पार्टीतील गाणी, इंग्रजी गाणी, धांगडधिंगा करणारी गाणी ऐकल्यानेही निसर्गाचा आनंद घेता येणार नाही, मग कोणती गाणी ऐकायची? तर अशी गाणी ऐकायची ज्याने निसर्गाशी, निसर्गाच्या निर्मात्याशी जवळीक होईल, अशी गाणी ऐकणे केव्हाही उत्तम. मग ही गाणी कोणती? तर याचे उत्तर आहे मराठी भजने (Marathi Bhajan). मराठी भजनांमधून (Marathi Bhajan) निसर्गाशी समरस होणे सहज शक्य होते. आऊट डोअरला जेव्हा आपण निसर्गरम्य ठिकाणी सहल म्हणून जातो तेव्हा शांत आवाजात भजने (Marathi Bhajan) ऐकल्याने त्याचा आनंद घेता येतो.

(हेही वाचा BYJU चा ९००० कोटींचा घोटाळा उघड; ‘फेमा’च्या तरतुदींचे उल्लंघन)

‘ही’ भजने तुम्हाला प्रवासात देतील आनंद

  • शोधीशी मानवा…
  • आकाशी झेप घे रे मानवा…
  • घनश्याम सुंदरा…
  • रामा रघुनंदना…
  • श्रीमन नारायण नारायण…
  • देव देव्हाऱ्यात नाही…
  • सुंदर ते ध्यान…
  • तुझे रूप चित्ती राहो…
  • उठा उठा सकळीक…
  • मागे उभा मंगेश…
Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.