Rahul Gandhi यांच्या सभेसाठी शिवाजी पार्क परिसराचे विद्रुपीकरण

प्रत्येक रस्ता, झाड, पोलसह रस्ता दुभाजकांवर लावले फलक

984
Rahul Gandhi यांच्या सभेसाठी शिवाजी पार्क परिसराचे विद्रुपीकरण
Rahul Gandhi यांच्या सभेसाठी शिवाजी पार्क परिसराचे विद्रुपीकरण

काँग्रेसचे नेते राहुल गांधी (Rahul Gandhi) यांच्या भारत जोडो न्याय यात्रेचा समारोप छत्रपती शिवाजी महाराज मैदानात (शिवाजी पार्क) रविवारी (१७ मार्च) रोजी होणार असून या यात्रेच्या समारोप जाहीर सभेच्या प्रचारासाठी संपूर्ण मैदान परिसरात बॅनर आणि फलक लावण्यात आले आहेत. काँग्रेसच्या पदाधिकाऱ्यांनी लावलेल्या फलक आणि बॅनरमुळे संपूर्ण शिवाजी महाराज पार्क परिसर आणि रस्ते भरून गेले आहेत. त्यामुळे संपूर्ण परिसर काँग्रेसमय होऊन एकप्रकारे विद्रुपतेचे दर्शन या परिसरात पहायला मिळत आहे. (Rahul Gandhi)

New Project 2024 03 15T193116.824

छत्रपती शिवाजी महाराज मैदान परिसरात काँग्रेस नेते राहुल गांधी (Rahul Gandhi) यांच्या प्रचार सभेची जय्यत तयारी सुरू असून काँग्रेसच्या प्रत्येक नेत्यांसह कार्यकर्ते चमकोगिरी करत आपापल्या वतीने बॅनर  आणि फलक लावले आहेत. छत्रपती शिवाजी महाराज पार्कच्या चारही बाजूंनी असलेल्या रस्त्यांच्या दुतर्फा तसेच मैदानाच्या अंतर्गत चालण्याच्या वाटेवर तसेच रस्त्यांच्या दुभाजकांवर बॅनर व फलक लावलेले आहेत. त्यामुळे संपूर्ण परिसरात बॅनर व फलकांशिवाय काहीच दिसत नसून स्वातंत्र्यवीर सावरकर मार्गावर तसेच या रस्त्यांच्या दुभाजकांवर आणि स्वातंत्र्यवीर सावरकर राष्ट्रीय स्मारकाच्या समोरच हे बॅनर आणि फलक लावले आहेत. याला सावरकर प्रेमी तसेच हिंदुत्ववादी संघटनांच्या पदाधिकाऱ्यांनी आक्षेप घेतला आहे. राहुल गांधी (Rahul Gandhi) यांनी कायमच स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्या विरोधात गरळ ओकण्याची आणि त्यांच्या विरोधात वक्तव्य करण्याचा प्रयत्न केला आहे. त्यामुळे राहुल गांधी (Rahul Gandhi) हे सावरकर द्वेष्टे असून त्यांची छायाचित्र असलेले फलक व बॅनर सावरकर यांच्या नावाने असलेल्या मार्गावर तसेच स्मारकाच्या समोर नको अशा प्रकारच्या प्रतिक्रिया एक्सवर दिल्या गेल्या असून याबाबत सोशल मिडियावरून महापालिकेकडे तक्रार करत हे फलक काढून टाकण्याची मागणी केली आहे. (Rahul Gandhi)


New Project 2024 03 15T193218.632

(हेही वाचा – Hub Power Company: पुलवामा हल्ल्यानंतर पाकिस्तानी कंपनीने भाजपाला पैसे दिले का? जाणून घ्या काय आहे सत्य)

यापूर्वी छत्रपती शिवाजी महाराज पार्क परिसरात अनेक राजकीय पक्षांकडून आपल्या शुभेच्छा तसेच अभिनंदन तसेच स्वागतांचे फलक लावले गेले; परंतु हे फलक लावताना कुठेही शिवाजी पार्कचा परिसर बकाल दिसणार नाही आणि विद्रुप होणार नाही याची काळजी घेतली गेली; परंतु काँग्रेस पक्षाच्या वतीने राहुल गांधी (Rahul Gandhi) यांचे फलक लावताना अशा प्रकारची कोणतीही काळजी घेतली नाही. जागा दिसेल तिथे हे लहान व मोठ्या आकाराचे फलक लावले गेले आहेत. त्यामुळे शिवाजी पार्क परिसरात येणाऱ्यांना रस्त्यावर चालताना समोरचे दर्शनही घडत नसून रस्ता दुभाजकांवर लावलेल्या फलकांमुळे अपघात होण्याची भीती वर्तवली जात आहे. काँग्रेसच्या सर्व हवशा, गवशा व नवशांनी राहुल गांधींचे स्वागतासह पक्षातील आपली एकनिष्ठता दिसून यावी म्हणून फलक लावण्यावर भर दिला आहे. अशाप्रकारे कधीही कोणत्याही राजकीय पक्षाने शिवाजी पार्क परिसर विद्रुप केला नव्हता. त्यामुळे या फलकांवर कारवाई करण्याची मागणी नागरिकांकडून केली जात आहे. (Rahul Gandhi)

हेही पहा –

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.