
सोसायटींमध्ये पशूंची हत्या न करण्याचा सर्वोच्च न्यायालयाचा (Supreme Court) आदेश आहे. असे असूनही मीरा-भाईंदरसारख्या मुसलमानबहुल भागांतील सोसायट्यांमध्ये बकरी ईदनिमित्त (Bakrid) हत्या करण्यासाठी पशूंना आणले जात आहे. बकरी ईदनिमित्त सोसायट्यांमध्ये अशा प्रकारे होणारी पशूंची अवैध हत्या प्रशासनाने रोखावी, असे आवाहन हिंदु जनजागृती समितीचे (Hindu Janjagruti Samiti) राष्ट्रीय प्रवक्ते रमेश शिंदे (Ramesh Shinde) यांनी केले आहे. याविषयी रमेश शिंदे यांनी मंत्रालयात वृत्तवाहिन्यांच्या प्रतिनिधींना मुलाखत दिली.
यावेळी रमेश शिंदे म्हणाले, ‘‘बकरी ईदनिमित्त सोसायट्यांमध्ये बकर्या आणून त्यांना कापले जाते. या वेळी रक्तमिश्रित पाणी आजूबाजूच्या परिसरात फेकले जाते. त्यामुळे रोगराई पसरते. याचा प्रशासनाने गांभीर्याने विचार करावा.’’
(हेही वाचा – बिहारमधील ‘SIR’ प्रक्रियेला Supreme Court ची मान्यता)
हिंदूंच्या सणांच्या वेळी प्रदूषणाची आवई उठवणारे आता कुठे आहेत ?
होळी, गणेशोत्सव आदी हिंदूंच्या सणांच्या वेळी हिंदी चित्रपट सृष्टीतील कलाकार, तसेच पुरोगामी मंडळी प्रदूषण होत असल्याची आवई उठवून ते रोखण्याचे आवाहन करण्यासाठी पुढे येतात. बकरी ईदनिमित्त पशूंच्या अवैध हत्या करून रक्तमिश्रित पाण्यामुळे होत असलेल्या रोगाच्या प्रादूर्भावाविषयी ही मंडळी का पुढे येत नाहीत ? असा प्रश्न या वेळी रमेश शिंदे यांनी या वेळी उपस्थित केला.
हेही पहा –
Join Our WhatsApp Community
