Terrorist Attack: कठुआत लष्कराच्या वाहनावर दहशतवादी हल्ला, जवानांनी हल्लेखोरांना दिलं जोरदार प्रत्युत्तर

हा भाग हिंदुस्थानी लष्कराच्या ९ कॉर्प्सच्या अंतर्गत येतो.

97
Terrorist Attack: कठुआत लष्कराच्या वाहनावर दहशतवादी हल्ला, जवानांनी हल्लेखोरांना दिलं जोरदार प्रत्युत्तर

जम्मू-काश्मीरातील (Terrorist Attack) कठुआ जिल्ह्यातील माचेडी भागात सोमवारी, (८ जुलै) दहशतवाद्यांनी भारतीय लष्कराच्या ताफ्यावर हल्ला केला. ज्या ठिकाणी हल्ला झाला ते ठिकाण लष्कराच्या ९ कॉर्प्सच्या अखत्यारित येते.

संरक्षण अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, ‘जम्मू आणि काश्मीरमधील कठुआ जिल्ह्यातील माचेडी भागात हिंदुस्थानी लष्कराच्या ताफ्यावर दहशतवाद्यांनी हल्ला केला. हा भाग हिंदुस्थानी लष्कराच्या ९ कॉर्प्सच्या अंतर्गत येतो.’ दहशतवादी हल्ल्यानंतर जवानांनी हल्लेखोरांना जोरदार प्रत्युत्तर दिलं. जवानांनी तात्काळ गोळीबार करून हल्ल्याला प्रत्युत्तर दिलं.

यामध्ये लष्कराच्या वाहनावर झालेल्या हल्ल्यात २ जवान जखमी झाले. लोही मल्हार ब्लॉकमधील माचेरी भागातील बदनोटा गावात ही घटना घडली. जखमी जवानांना रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. माचेरीमध्ये दहशतवादी आणि सुरक्षा दलांमध्ये चकमक सुरू आहे. या भागात अधिक सुरक्षा दल पाठवण्यात आले आहे.

४ मे रोजी जम्मू-काश्मीरच्या पूंछमध्ये हवाई दलाच्या ताफ्यावर हल्ला झाला होता. या हल्ल्यात कॉर्पोरेल विक्की पहाडे हा जवान शहीद झाला होता आणि ४ सैनिक जखमी झाले होते.

हेही पहा – 

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.