Kashmir मध्ये चकमकीत ठार झालेल्या दहशतवाद्यांनी घराच्या कपाटामागे खोदला बंकर

मारले गेलेले दहशतवादी हिजबुल मुजाहिद्दीनशी संबंधित होते.

129

काश्मीरमध्ये (Kashmir) भारतीय जवान आणि दहशतवादी यांच्यात जोरदार चकमक झाली. त्यामध्ये ६ दहशतवादी ठार झाले, मात्र त्याचवेळी दोन जवान हुतात्मा झाले. जेव्हा भारतीय जवानांनी दहशतवादी लपून बसलेल्या घराची पाहणी केली तेव्हा धक्कादायक बाब समोर आली. या घरात एक कपाटाच्या मागे दहशतवाद्यांनी चक्क बंकर खोदला होता.

जम्मू-काश्मीरमधील (Kashmir) कुलगाममध्ये 6 आणि 7 जुलै रोजी मुद्राघम आणि चिन्निगाम फ्रिसालमध्ये सुरक्षा दल आणि दहशतवाद्यांमध्ये गोळीबार झाला होता. या चकमकीत सुरक्षा दलांनी सहा दहशतवाद्यांचा खात्मा केला. दोन जवानही हुतात्मा झाले. अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, मारले गेलेले दहशतवादी हिजबुल मुजाहिद्दीनशी संबंधित होते. त्यापैकी एक पाकिस्तानशी संबंधित दहशतवादी संघटनेचा स्थानिक कमांडर होता. चकमकीनंतर जवानांनी दहशतवादी लपलेल्या घराची झडती घेतल्याचा व्हिडीओ समोर आला आहे. या व्हिडिओमध्ये एका घरात लाकडी कपाट दिसत आहे. कपाटाच्या मागे काही ड्रॉवर्स आहेत, जे काढल्यावर एक अरुंद रस्ता दिसून येतो. ही वाट बंकरकडे जाते. चिनीगाम फ्रिसल भागात ठार झालेल्या 6 पैकी 4 दहशतवादी या बंकरमध्ये लपून बसले होते, असा दावा केला जात आहे.

(हेही वाचा Rahul Gandhi : गांधी घराण्याच्या वंशजाची बालकबुद्धी!)

लढाई शेवटपर्यंत सुरूच राहणार 

जम्मू-काश्मीरचे (Kashmir) डीजीपी आरआर स्वेन म्हणाले की, एवढ्या मोठ्या संख्येने दहशतवाद्यांना ठार मारणे ही मोठी उपलब्धी आहे. सुरक्षा वातावरण मजबूत करण्याच्या दिशेने हा एक मैलाचा दगड आहे. स्वेन म्हणाले की, ऑपरेशनचे यश हे जम्मू-काश्मीरमधील दहशतवाद संपवण्याची लढाई शेवटपर्यंत पोहोचणार असल्याचे संकेत आहे.

 

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.