Accident : नाशिक-पुणे महामार्गावर भीषण अपघात; चौघांचा मृत्यू

251
नाशिक – पुणे महामार्गावर चंदनापुरी गावाजवळ एक मोठा अपघात (Accident) झाला. या भीषण अपघातात चार जणांचा जागीच मृत्यू झाला. मालवाहतूक ट्रक महामार्गावरून जात असताना तो कारवर चढला, त्यामुळे या अपघातात कारमधील चौघे जण जागीच मृत झाल्याची प्राथमिक माहिती मिळाली आहे.
या दुर्घटनेनंतर ट्रकचालक फरार झाला. अपघातानंतर (Accident) स्थानिक नागरिकांनी घटनास्थळी एकच गर्दी केली होती. पोलिसही घटनास्थळी दाखल झाले. मृतांची अद्याप ओळख पटू शकलेली नाही. पोलिसांचे ओळख पटवण्याचे काम सुरु आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, रात्री आठ वाजताच्या सुमारास संगमनेर तालुक्याच्या पोलीस ठाण्याच्या हद्दीतील चंदनापुरी घाटात नाशिककडे जाणाऱ्या एक ट्रक आणि कारमध्ये भीषण अपघात झाला आहे. अपघातातील (Accident) मृतांमध्ये दोन पुरुष, एक महिला आणि एका लहान चिमुकल्याचा समावेश आहे. तर एक महिला जखमी झालेली आहे.
Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.