TCS bribe-for-job Probe : आयटी कंपनी टीसीएसने नोकरीसाठी लाच घेतल्याचा आरोप असलेल्या १६ कर्मचाऱ्यांना कामावरून काढलं, काय आहे प्रकरण?

६ व्हेंडरवरही कारवाई केली आहे.

72
TCS bribe-for-job Probe : आयटी कंपनी टीसीएसने नोकरीसाठी लाच घेतल्याचा आरोप असलेल्या १६ कर्मचाऱ्यांना कामावरून काढलं, काय आहे प्रकरण?
TCS bribe-for-job Probe : आयटी कंपनी टीसीएसने नोकरीसाठी लाच घेतल्याचा आरोप असलेल्या १६ कर्मचाऱ्यांना कामावरून काढलं, काय आहे प्रकरण?
  • ऋजुता लुकतुके

दिग्गज आयटी कंपनी टीसीएसने सखोल तपासानंतर कंपनीत नोकरीचं आमीष दाखवून लाच घेतलेल्या १६ कर्मचाऱ्यांवर कारवाई करताना कंपनीतून काढून टाकलं आहे. ६ व्हेंडरवरही कारवाई केली आहे. (TCS bribe-for-job Probe)

टीसीएस कंपनीत नोकरी देतो असं आमीष दाखवून त्यासाठी लाच घेणाऱ्या १६ कर्मचाऱ्यांना अखेर कंपनीने नारळ दिला आहे. तसंच रोजगार सेवा पुरवणाऱ्या ६ कंत्राटदारांची सेवाही त्वरित बंद करण्यात आल्याचं कंपनीने एनएससी तसंच बीएससी एक्सचेंजना कळवलं आहे. (TCS bribe-for-job Probe)

काही रोजगार कंपन्यांचे अधिकारी आपल्याकडे आलेल्या अर्जदारांना टीसीएसमध्ये नोकरी मिळवून देण्यासाठी कंपनीतल्या वरिष्ठ अधिकाऱ्यांना लाच देत असल्याचं प्रकरण मध्यंतरी बाहेर आलं होतं. त्यानंतर कंपनीने आपली अंतर्गत चौकशी समिती नेमून या प्रकरणाचा सखोल तपास केला. (TCS bribe-for-job Probe)

‘आम्ही केलेल्या तपासात १९ अधिकारी या घोटाळ्यात सहभागी असल्याचं आढळून आलं. यातील १६ जणांना काढून टाकण्यात आलंय. तर ३ जणांना कंपनीपासून दूर ठेवण्यात येणार आहे. शिवाय रोजगार सेवा पुरवणाऱ्या ६ एजन्सीबरोबर कंपनीने संबंध तोडले आहेत,’ असं टीसीएसने याविषयी स्पष्ट केलं आहे. (TCS bribe-for-job Probe)

इथून पुढे कंपनीच्या मनुष्यबळ विभागातील अधिकाऱ्यांवर अधिक दक्षपणे लक्ष ठेवलं जाईल आणि कंपनीकडून नियमांचं कठोर पालन केलं जाईल, असंही कंपनीने म्हटलं आहे. टीसीएस कंपनीने अलीकडेच आपला दुसऱ्या तिमाहीचा निकाल प्रसिद्ध केला. पण, निकालापेक्षा नोकरी घोटाळ्याचंच सावट शेअर बाजारांवर दिसून आलं आणि तेव्हापासून टीसीएसच्या शेअरमध्ये मोठी घसरण पाहायला मिळाली आहे. (TCS bribe-for-job Probe)

(हेही वाचा – Israel Palestine Conflict : पुरवठा थांबल्यास हजारो रुग्णांचा मृत्यू अटळ, इस्रायल येथील डॉक्टरांचा इशारा)

‘नोकरीसाठी लाच’ हे प्रकरण काय आहे?

टीसीएसमधील हा रोजगार घोटाळा सर्वप्रथम उघड झाला तो २३ जून २०२३ रोजी. कंपनीने स्टॉक एक्सचेंजला इतकीच माहिती दिली की, रिसोर्स मॅनेजमेंट फर्म या कंपनीशी टीसीएसचा काहीही संबंध नाही आणि कर्मचारी भरतीसाठी कंपनीने त्यांची मदत कधीही घेतलेली नाही. (TCS bribe-for-job Probe)

पण, या स्पष्टीकरणानंतर समोर आला तो एक मोठा कर्मचारी भरती घोटाळा. २९ जून २०२३ ला टाटा समुहाचे अध्यक्ष एन चंद्रशेखर यांनी कंपनी या प्रकरणाचा अंतर्गत तपास करत असल्याचं सांगून घोटाळ्याची कबुलीच दिली. (TCS bribe-for-job Probe)

कंपनीला विविध माहिती तंत्रज्ञान प्रकल्पांवर काम करण्यासाठी कुशल कामगार हवे असतात. प्रकल्पाची गरज लक्षात घेऊन टीसीएस कंपनी रोजगार एजन्सीची मदत घेऊन कंपनी कधी कंत्राटी पद्धतीने तर कधी कायमस्वरुपी कर्मचारी भरती करते. अशा एजन्सी आपल्याकडे असलेल्या उमेदवारांची वर्णी टीसीएस कंपनीत लागावी यासाठी टीसीएसच्या मनुष्यबळ विकास विभागातील अधिकाऱ्यांना लाच देत होती अशी गोष्ट उघड झाली. (TCS bribe-for-job Probe)

शिवाय टीसीएस कंपनीचं अस्तित्व जगभरात ५५ देशांमध्ये असल्यामुळे कंपनी जगभरात अशा एजन्सीची मदत घेत असते. त्यामुळे हा घोटाळा आंतरराष्ट्रीयही आहे. अर्थात, नेमकी किती कर्मचारी भरती ही या माध्यमातून झालेली आहे, याविषयीची माहिती कंपनीने उघड केलेली नाही. (TCS bribe-for-job Probe)

हेही पहा –

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.