मुरबाड येथे अनेक टॅक्सीचालक २००२ पासून त्यांच्या कुटुंबाचे, मुलाबांळाचे संगोपन आणि त्यांचे शिक्षण टॅक्सीच्या (Taxi) उत्पन्नातून करीत होते. परंतु १६ डिसेंबर २०२४ पासून त्यांच्या टॅक्सी बंद झाल्यामुळे त्यांच्यावर आता उपासमारीची वेळ आली आहे. हे टॅक्सी चालक २००१ पासून गामा मॅक्स चालवत आहेत. पण आता त्यांच्या टॅक्सी गाड्यांची मुदत संपलेली आहे. त्यामुळे त्यांच्या गाड्यांवर परिवहन अधिकारी केसेस करून २५ ते ३० हजार इतके दंड आकारात आहेत आणि टॅक्सी (Taxi) जमा करत आहेत. एक बाजूला या टॅक्सी चालकांना सरकार जबरदस्तीने इको गाडीवरचा नवीन परमीट देण्याचा हट्ट करत आहे, ही गाडी मुळातच असुरक्षित आहे, त्यामुळे या टॅक्सी चालकांना सुरक्षित सीएनजी गाड्यांवर परमीट चढवून देण्याची मागणी करत आहेत. त्यांच्या मागणीला स्वतः राज्य सरकारने हिरवा कंदील दाखवला तरीही कल्याण उप प्रादेशिक परिवहन कार्यालय त्याकडे दुर्लक्ष करत आहे. अधिकाऱ्यांच्या मनमानीपणामुळे आता भुमिपुत्र टॅक्सी संघटना मुरबाड कल्याण तालुका ठाणे जिल्ह्याचे अध्यक्ष कैलास घोलप यांनी १२ जानेवारीपासून ठाणे जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आमरण उपोषण करण्याचा इशारा दिला आहे.
या संघटनेने उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, परिवहन कार्यालय, प्रादेशिक परिवहन कार्यालय या सर्वांना वारंवार पत्रव्यवहार केले. सरकारने टॅक्सी (Taxi) चालकांच्या व्यथा समजून घेतल्या. पण कल्याण उप प्रादेशिक परिवहन कार्यालयातील अधिकारी सरकारच्या आदेशाला जुमानत नाहीत. या संघटनेच्या म्हणण्यानुसार, त्यांचे रिजनल टॅक्सी परमिट आहे. संपूर्ण महाराष्ट्रात त्यासाठी एकच इको गाडीवर परमिट चढत आहे. सदर गाडीचे दुर्दैवाने अपघात झाल्यास टॅक्सी (Taxi) चालक व समोरील बसणारा प्रवासी दुर्दैवी ठरतात. या इको गाडीचे अपघाताचे प्रमाण जास्त आहे. तसेच त्या गाडीचे इंजिन चालकाच्या आसनाखाली आहे. त्याला हवा लागत नसल्याने या इंजिनचे काम सतत करावे लागते. म्हणून त्यांना CNG मध्ये (मारुती कंपनीची) इर्टिका गाडी, (महेंद्र कंपनीची) वोलेरो गाडी, (फोर्स कंपनीची) गामा गाडी या पैकी कोणत्या तरी एका CNG गाडीला परवानगी मिळावी. जुन्या टॅक्सीवरील परमिट उतरवून नव्या टॅक्सी (Taxi) गाडीवर चढवून मिळावे, अशी मागणी या संघटनेने केली आहे. या संघटनेच्या अनेक टॅक्सी चालकांनी कर्जे घेऊन १२-१२ लाखांच्या सीएनजी गाड्या घेतल्या आहेत.

पण कल्याण उप प्रादेशिक परिवहन कार्यालयाचे अधिकारी त्यांच्या नव्या गाड्यांवर जुने परमीट चढवून देत नसल्यामुळे वर्षभरापासून या गाड्या बंद अवस्थेत आहेत. तसेच दुसरीकडे परिवहन अधिकाऱ्यांची कारवाई सुरूच असल्यामुळे गेले ३० ते २५ वर्षांपासून टॅक्सीवर (Taxi) कुटुंब सांभाळत असलेल्या टॅक्सी चालकांचा रोजगार संपुष्टात आला आहे. तसेच दुसरे काम करण्याची त्यांची वयोमर्यादा निघून गेली आहे, अशी व्यथा या संघटनेने मांडली आहे. दोन वर्षे वारंवार सरकार दरबारी पत्रव्यवहार करूनही संघटनेच्या पदरी निराशा पडत आहे. सरकार येथील टॅक्सी (Taxi) चालकांच्या मागणीकडे दुर्लक्ष करत आहे. त्यामुळे आता या टॅक्सी चालकाची सहनशीलता संपली आहे. हे टॅक्सी चालक आता टोकाची भूमिका घेण्याच्या तयारीत आहेत. त्यांनी आमरण उपोषणाचा इशारा दिला आहे.
Join Our WhatsApp Community


