Tata Steel Job Cut : टाटा स्टील इंग्लंडमध्ये २,८०० जणांची नोकर कपात करणार

युकेमधील दोन पोलाद भट्ट्या बंद करण्याचा निर्णयही टाटा स्टीलने घेतला आहे. 

171
Tata Steel Job Cut : टाटा स्टील इंग्लंडमध्ये २,८०० जणांची नोकर कपात करणार
Tata Steel Job Cut : टाटा स्टील इंग्लंडमध्ये २,८०० जणांची नोकर कपात करणार
  • ऋजुता लुकतुके

भारतीय पोलाद उद्योगाचे जनक टाटा स्टील कंपनी या वर्षाच्या शेवटी युनायटेड किंग्डमच्या वेल्स भागात असलेल्या कंपनीच्या दोन पोलाद भट्ट्या बंद करणार आहे. त्यामुळे २,८०० कर्मचाऱ्यांवर बेकारीची कुऱ्हाड कोसळणार आहे. टाटा स्टील कंपनीचा युकेमधील पोलाद उद्योग हा सध्या तोट्यात सुरू आहे. त्यामुळे उत्पादन खर्च कमी करण्याच्या दृष्टीने कंपनीने तिथे वीजेवर चालणाऱ्या आणि कार्बन उत्सर्जन आटोक्यात ठेवणाऱ्या भट्ट्या सुरू करण्याचा निर्णय घेतला आहे. (Tata Steel Job Cut)

‘पोर्ट टॅलबॉटमध्ये असलेल्या टाटा स्टीलच्या दोन भट्ट्या टप्प्या टप्प्याने बंद करण्यात येतील. आणि तिथलं कामकाजही थांबवण्यात येईल,’ असं कंपनीने शुक्रवारी काढलेल्या पत्रकात म्हटलं आहे. आणि त्यामुळे येत्या १८ महिन्यात २,५०० नोकऱ्या जातील. आणि एकूण २,८०० जणांची नोकर कपात होऊ शकते. (Tata Steel Job Cut)

(हेही वाचा – Devendra Fadanvis : देवेंद्र फडणवीसांनी सांगितली पंतप्रधान मोदींची रामराज्याची संकल्पना; म्हणाले… )

निवृत्तीच्या जवळ आलेल्या कर्मचाऱ्यांना सुयोग्य मोबदला – टी व्ही नरेंद्रन

युकेमधील टॅलबॉट इथं असलेलं टाटा स्टील कंपनीचं साम्राज्य येत्या काही वर्षांत पर्यावरणपूरक करण्याकडे कंपनीचा भर असणार आहे. आणि त्या दृष्टीने तिथं कर्मचारी विभागांची पुनर्रचनाही करण्यात येणार आहे. ‘युकेमध्ये उत्तम दर्जाचं आणि सातत्यपूर्ण उत्पादन असलेली पोलाद निर्मिती सुरू ठेवणं हे टाटा स्टीलचं उद्दिष्टं आहे. आणि त्यासाठी येत्या दशकभरात युकेमध्ये कंपनी मोठी भांडवली गुंतवणूकही करणार आहे. आणि कर्मचारी कपातही निवृत्तीच्या जवळ आलेल्या कर्मचाऱ्यांना सुयोग्य मोबदला देऊन केली जाईल,’ असं टाटा स्टीलचे मुख्य कार्यकारी अध्यक्ष टी व्ही नरेंद्रन यांनी स्पष्ट केलं. (Tata Steel Job Cut)

टाटा स्टीलच्या युकेमधील कंपन्यांमध्ये एकूण ८,००० कर्मचारी कार्यरत आहेत. नोकरी गमावलेल्या कर्मचाऱ्यांच्या कुटुंबीयांसाठी तसंच त्यांना नवीन नोकरी शोधण्यासाठी मदत म्हणून कंपनीने १३० दशलक्ष पाऊंडांची तरतूद केल्याचंही टाटा स्टीलने स्पष्ट केलं आहे. (Tata Steel Job Cut)

हेही पहा –

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.