Tata Motors ने बजाज फायनान्‍ससोबत केला सामंजस्‍य करार

97
Tata Motors ने बजाज फायनान्‍ससोबत केला सामंजस्‍य करार

टाटा मोटर्स या भारतातील सर्वात मोठ्या व्‍यावसायिक वाहन उत्‍पादक कंपनीने देशातील सर्वात मोठा आर्थिक सेवा समूह बजाज फिनसर्व्‍ह लि.चा भाग असलेल्‍या बजाज फायनान्‍स लि.सोबत सामंजस्‍य करारावर (एमओयू) स्‍वाक्षरी केली आहे. बजाज फायनान्‍स संपूर्ण व्‍यावसायिक वाहन पोर्टफोलिओकरिता फायनान्सिंग सोल्‍यूशन्‍स देईल आणि ग्राहकांना कंपनीची व्‍यापक पोहोच, स्‍पर्धात्‍मक व्‍याजदर, फ्लेक्‍सी कर्ज व डिजिटली-सक्षम कर्ज प्रक्रियेचा फायदा होईल. (Tata Motors)

या सहयोगाबाबत मत व्‍यक्‍त करत टाटा मोटर्स कमर्शियल वेईकल्‍सच्‍या ट्रक्‍स विभागाचे उपाध्‍यक्ष व व्‍यवसाय प्रमुख राजेश कौल म्‍हणाले, ”आम्‍हाला ग्राहकांना आनंदित करण्‍याकरिता उच्‍चस्‍तरीय सोल्‍यूशन्‍स देण्‍याचा आमच्‍यासारखा दृष्टिकोन असलेली कंपनी बजाज फायनान्‍ससोबत सहयोग करण्‍याचा आनंद होत आहे. आम्‍हाला विश्‍वास आहे की, व्‍यावसायिक वाहन फायनान्सिंगमधील त्‍यांचा पहिला उद्यम त्‍यांना परिवहन क्षेत्रातील व्‍यापक क्षमतांना व्‍यापून घेण्‍यास साह्य करेल आणि हा सहयोग देशभरातील उद्योजकांना फायदे देईल. ग्रामीण व शहरी भागांमध्‍ये बजाज फायनान्‍सच्‍या व्‍यापक नेटवर्कसह ग्राहकांना त्‍यांच्‍या गरजांनुसार सहजपणे फायनान्सिंग सोल्‍यूशन्‍स उपलब्‍ध होतील. आम्‍ही बहुमूल्‍य ग्राहकांना सुधारित सोयीसुविधा देण्‍यास उत्‍सुक आहोत.” (Tata Motors)

(हेही वाचा – Indian Football News : माजी राष्ट्रीय प्रशिक्षक इगॉर स्टिमॅकवर भारतीय फुटबॉल फेडरेशन का भडकली?)

या विकासाबाबत मत व्‍यक्‍त करत बजाज फायनान्‍सचे उप-व्‍यवस्‍थापकीय संचालक अनुप साहा म्‍हणाले, ”बजाज फायनान्‍समध्‍ये आमच्‍या व्‍यवसायाचे ग्राहक-केंद्रित्वाचे तत्त्व आहे. आम्‍ही ग्राहकांना सोईस्‍कर फायनान्सिंग सोल्‍यूशन्‍स देतो, ज्‍यामुळे त्‍यांचा मालकीहक्‍क अनुभव अधिक उत्‍साहित होतो. टाटा मोटर्ससोबतच्‍या आमच्‍या सहयोगामधून ही कटिबद्धता दिसून येते. भारतातील स्‍टॅकचा वापर करत आमच्‍या दर्जात्‍मक प्रक्रियेसह आमचा व्‍यावसायिक वाहन खरेदी करण्‍याची प्रक्रिया सोपी व विनासायास करण्‍याचा मनसुबा आहे. आम्‍हाला विश्‍वास आहे की, हा सहयोग अधिकाधिक व्‍यावसायिक वाहन मालकांना फायनान्सिंग सोल्‍यूशन्‍ससह सक्षम करेल.” (Tata Motors)

टाटा मोटर्स सब १-टन ते ५५ टन कार्गो वाहनांची आणि १०-सीटर ते ५१-सीटर मास मोबिलिटी सोल्‍यूशन्‍सची व्‍यापक श्रेणी देते, ज्‍यामध्‍ये लॉजिस्टिक्‍स आणि मास मोबिलिटी विभागांच्‍या विकसित होत असलेल्‍या गरजांची पूर्तता करण्‍यासाठी लहान व्‍यावसायिक वाहने व पिकअप्‍स, ट्रक्‍स आणि बसेस विभागांचा समावेश आहे. कंपनी आपल्‍या २५०० हून अधिक टचपॉइण्‍ट्सच्‍या व्‍यापक नेटवर्कच्‍या माध्‍यमातून अद्वितीय दर्जा आणि सेवा कटिबद्धतेची खात्री देते. या नेटवर्कचे कार्यसंचालन प्रशिक्षित स्‍पेशालिस्‍ट्सकडून पाहिले जाते आणि टाटा जेन्‍यूएन पार्ट्सचे पाठबळ आहे. बजाज फायनान्‍स भारतातील सर्वात वैविध्‍यपूर्ण एनबीएफसी आहे, जिची कर्ज, ठेवी व पेमेंट्समध्‍ये उपस्थिती आहे आणि ८३.६४ दशलक्षहून अधिक ग्राहकांना सेवा देते. ३१ मार्च २०२४ पर्यंत कंपनीची व्‍यवस्‍थापनांतर्गत मालमत्ता ३,३०,६१५ कोटी रूपये होती. (Tata Motors)

हेही पहा –

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.