Tanisha Bhise यांच्या जुळ्या बाळांना मुख्यमंत्री सहाय्यता निधीतून २४ लाखांची तातडीची मदत

पुढील उपचारांचाही खर्च मुख्यमंत्री सहाय्यता निधीतूनच करण्याचे आश्वासन

78
Tanisha Bhise यांच्या जुळ्या बाळांना मुख्यमंत्री सहाय्यता निधीतून २४ लाखांची तातडीची मदत
  • प्रतिनिधी

पुण्यातील तनिषा भिसे (Tanisha Bhise) यांच्या दुर्दैवी निधनाने संपूर्ण समाज हळहळला, मात्र त्यांच्या पोटी जन्मलेली जुळी बाळंतीण आशेचा किरण ठरली आहेत. या नवजात बाळांच्या जीवनासाठी मुख्यमंत्री सहाय्यता निधीतून तातडीने २४ लाखांची आर्थिक मदत करण्यात आली असून, पुढील उपचारांचाही सर्व खर्च या निधीतूनच केला जाणार आहे.

(हेही वाचा – Pakistan च्या महिला पत्रकाराने दाखवली स्वतःची औकात; लंडनमधील हॉटेलमध्ये आई-बहिणीवरून दिल्या शिव्या )

तनिषा भिसेंचा (Tanisha Bhise) प्रसूतीदरम्यान मृत्यू झाला, मात्र त्यांचे जुळ्या बाळांचे वजन अत्यल्प असल्याने त्यांना पुण्याच्या सूर्या हॉस्पिटलच्या अतिदक्षता विभागात दाखल करण्यात आले आहे. दोन्ही बाळांच्या उपचारांचा खर्च लाखोंच्या घरात असून, रुग्णालयाने सादर केलेल्या अंदाजपत्रकानुसार मुख्यमंत्री सहाय्यता निधी कक्षाने २४ लाख रुपये वितरित केले आहेत. एका बाळासाठी १० लाख तर दुसऱ्यासाठी १४ लाखांची मदत देण्यात आली आहे.

(हेही वाचा – पुण्यात ‘Hit And Run’ ! भरधाव मर्सिडीज कारने दुचाकीस्वाराला उडवलं ; एकाचा मृत्यू , दोन जखमी)

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी स्वतः भिसे कुटुंबीयांची भेट घेऊन भावनिक आधार दिला होता. त्यांनी दिलेल्या मदतीच्या आश्वासनानुसार रक्कम थेट रुग्णालयात वर्ग करण्यात आली आहे. कक्षप्रमुख रामेश्वर नाईक यांनी सांगितले की, बाळांच्या प्रकृतीत हळूहळू सुधारणा होत असून, त्यांचे प्राण वाचवण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न सुरू आहेत.

हेही पहा –

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.