Water cut : मुलुंडकरांनो, पाणी वापरा जपून

मुलुंड अमर नगर येथे ६०० मि.मी व्यासाची तानसा जलवाहिनीला मंगळवारी संध्याकाळी सव्वा पाच वाजताच्या सुमारास मोठ्या प्रमाणात गळती निर्माण झाली.

204
मुलुंड येथील तानसा जलवाहिनीला गळती निर्माण झाल्याने यांच्या दुरुस्तीचे काम तातडीने हाती घेतले जाणार आहे. हे काम बुधवारी सकाळी हाती घेतले जाणार असून दुरुस्तीचे काम पूर्ण होईपर्यंत मुलुंड भागातील पाणी पुरवठा खंडित राहणार आहे. त्यामुळे मुलुंड कॉलनी, अमर नगर भागासह काही भागांत पाणी पुरवठा होणार नाही.
मुलुंड अमर नगर येथे ६०० मि.मी व्यासाची तानसा जलवाहिनीला मंगळवारी संध्याकाळी सव्वा पाच वाजताच्या सुमारास मोठ्या प्रमाणात गळती निर्माण झाली. ही जलवाहिनी फुटल्याची बाब निदर्शनास आल्याने महापालिका टी विभाग आणि गळती शोधक पथकाच्या माध्यमातून या जलवाहिनीच्या दुरुतीचे काम बुधवारी सकाळी ११ वाजता हाती घेतले जाणार आहे. त्यामुळे जलवाहिनीच्या दुरुस्तीचे काम पूर्ण झाल्यानंतरच या भागातील पाणी पुरवठा सुरळीत होईल असे महापालिकेने कळवले आहे.
Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.