तामिळनाडूच्या (Tamilnadu) विरुदुनगरमध्ये एक मोठी घटना घडली आहे. अग्निशमन आणि बचाव विभागामार्फत मिळालेल्या माहितीनुसार, फटाक्यांच्या कारखान्यात झालेल्या स्फोटात १६ जणांचा मृत्यू झाला असून सहा जण जखमी झाले आहेत, अशी प्राथमिक माहिती मिळाली आहे. (Tamilnadu)
(हेही वाचा – Italy मध्ये 2 भारतीयांची गोळ्या झाडून हत्या; गुरुद्वारातून बाहेर पडताना हल्ला)
नेमकं काय प्रकरण आहे?
मिळालेल्या वृत्तानुसार, कट्टनार पट्टी येथील फटाक्यांच्या कारखान्यात मोठा स्फोट झाला. या कारखान्यात आकर्षक फटाके बनवले जातात. हा कारखाना गोविंदनल्लूर येथील रहिवासी मुथू मणिकम (Muthu Manickam) यांच्या मालकीचा आहे. रविवार १९ एप्रिलला दुपारी कामगार फटाक्यांना माळ घालत असताना कारखान्यात हा स्फोट झाला. जखमींना उपचारासाठी विरुधुनगर येथील शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. मृतांचा आकडा आणखी वाढण्याची शक्यता आहे.
यापूर्वी फटाक्यांच्या कारखान्यात झालेल्या स्फोटात २१ जणांचा मृत्यू
फेब्रुवारी २०२६ मध्ये, आंध्र प्रदेशातील काकीनाडा जिल्ह्यातील एका फटाक्यांच्या कारखान्यात मोठा स्फोट झाला. यात २१ जणांचा मृत्यू झाला आणि आठ जण जखमी झाले. आंध्र प्रदेशचे मुख्यमंत्री एन. चंद्रबाबू नायडू (CM Chandrababu Naidu) यांनी या घटनेबद्दल दुःख व्यक्त केले आणि म्हणाले, ‘काकीनाडा जिल्ह्यातील वेटलापलेम गावातील फटाके निर्मिती युनिटमध्ये झालेल्या स्फोटातील जीवितहानी अत्यंत दुःखद आहे. आम्ही बचाव कार्यावर लक्ष ठेवून आहोत आणि पीडित कुटुंबांना मदत करू.’ त्यांनी मृतांच्या कुटुंबीयांना २० लाख रुपयांची नुकसान भरपाई जाहीर केली. तसेच, जखमींचा वैद्यकीय खर्च सरकार उचलेल असेही त्यांनी सांगितले.
(हेही वाचा – Iran US War : १८० ड्रोन पाडले, अमेरिकन एफ-३५लाही लक्ष्य केल्याचा इराणचा दावा)
कठोर नियम लागू करा
देशभरातील फटाक्यांच्या कारखान्यांमध्ये (firecracker factory Blast) झालेल्या स्फोटांमुळे अनेक लोकांनी आपले प्राण गमावले आहेत. त्यामुळे, अशा घटनांना आळा घालण्यासाठी सरकारने कठोर नियम लागू करणे आवश्यक आहे.
हेही पहा –
Join Our WhatsApp Community

