Talathi Exam : तलाठी भरती परीक्षा केंद्रावर वेळेपूर्वीच प्रवेशद्वार बंद; विद्यार्थ्यांनी घातला गोंधळ

142
Talathi Exam : तलाठी भरती परीक्षा केंद्रावर वेळेपूर्वीच प्रवेशद्वार बंद; विद्यार्थ्यांनी घातला गोंधळ

सध्या राज्यात तलाठी भरतीसाठीच्या (Talathi Exam) परीक्षा सुरु आहेत. मात्र या परीक्षेमधील गोंधळ दिवसेंदिवस वाढतच आहे. अशातच आज (२८ ऑगस्ट, सोमवार) पुन्हा परीक्षा केंद्रावर गोंधळ निर्माण झाला आहे.

तलाठी भरती परीक्षेमधील (Talathi Exam) विविध गोंधळामुळे ही परीक्षा चर्चेत आहे. परीक्षेतील सततच्या गैरप्रकारांमुळे परीक्षा स्थगितीची मागणी केली जात असतानाच मुंबईतील एका परीक्षा केंद्रावर गोंधळाचा नवा प्रकार पाहायला मिळाला. आज, २८ ऑगस्ट २०२३ ला मुंबईतील, पवई आयटी पार्कच्या परीक्षा केंद्रावर परीक्षार्थी उमेदवार केंद्रावर पोहोचण्यापूर्वीची केंद्राचे मुख्य प्रवेशद्वार बंद केल्यामुळे उमेदवारांमध्ये गोंधळाचे वातावरण पाहायला मिळाले.

मुंबईतील, पवई आयटी पार्क परीक्षा केंद्रावर (Talathi Exam) उमेदवारांना सकाळी ८ वाजता हजार राहण्याचे सांगण्यात आले होते. ९.०० वाजता या परीक्षेच्या सत्र १ मधील पेपरला सुरुवात होणार होती. त्यामुळे, परीक्षेपूर्वी आणि दिलेल्या वेळेनुसार परीक्षर्थी उमेदवार परीक्षा केंद्रावर पोहोचले. मात्र, दिल्या गेलेल्या वेळेपूर्वीची परीक्षा केंद्राचे मुख्य प्रवेशद्वार बंद करून, या परीक्षा केंद्रावर काही उमेदवारांना प्रवेश नाकरण्यात आल्याने या उमेदवारांची परीक्षा केंद्राबाहेर गर्दी पाहाला मिळाली.

(हेही वाचा – PM Narendra Modi : पंतप्रधान मोदींनी केले गोल्डन बॉय नीरज चोप्राचे अभिनंदन)

सदर, परीक्षा केंद्रावर उमेदवारांशी (Talathi Exam) संवाद साधायला किंवा घडल्या प्रकारची माहिती देण्यासाठी कोणताही परीक्षा केंद्र अधिकारी उपस्थित नसल्यामुळे या केंद्रावरील विदर्थ्यांमध्ये संतापाचे वातावरण पाहायला मिळाले.

यापूर्वी सर्व्हर डाऊन झाल्याने गोंधळ

सोमवार २१ ऑगस्ट रोजी सर्व्हरच्या तांत्रिक बिघाडामुळे परीक्षा (Talathi Exam) वेळेवर सुरू झाल्या नव्हत्या. त्यामुळे राज्यातील नागपूरसह अकोला, छत्रपती संभाजीनगर, लातूर आदी अनेक परीक्षा केंद्रावर प्रचंड गोंधळ पाहायला मिळाला. परीक्षा केंद्रांवर (Talathi Exam) मोठ्या संख्येने उमेदवार प्रवेश पत्र हातात घेऊन उभे होते पण त्यांना वर्गात प्रवेश दिला जात नव्हता. त्यामुळे उमेदवार संतप्त झाले. या आधी नाशिकमध्ये तलाठी भरतीच्या परीक्षेत हायटेक कॉपीचा प्रकार उघडकीस आला होता. त्यामुळे यापुढे तरी तलाठी परीक्षा निर्विघ्नपणे पार पडतील का, असा प्रश्न तलाठी पदाचे परीक्षार्थी विचारत आहेत.

हेही पहा – 

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.