Swatantrya Veer Savarkar : स्वातंत्र्य वीर सावरकर चित्रपटाला दिल्लीकर प्रेक्षकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद

Swatantrya Veer Savarkar : रणदीप हुड्डा यांच्या 'स्वातंत्र्य वीर सावरकर' या मराठी चित्रपटाचा विशेष शो आयोजित करण्यात आला. महादेव रोडवरील फिल्म्स डिव्हिजन ऑडिटोरियम येथे आयोजित या प्रक्षेपणाला दिल्लीकर मराठी प्रेक्षकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला.

212
Swatantrya Veer Savarkar : स्वातंत्र्य वीर सावरकर चित्रपटाला दिल्लीकर प्रेक्षकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद
Swatantrya Veer Savarkar : स्वातंत्र्य वीर सावरकर चित्रपटाला दिल्लीकर प्रेक्षकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद

स्वातंत्र्यवीर सावरकर (Swatantrya Veer Savarkar) म्हटले की, आठवण होते ती प्रखर देशभक्तीची. याच देशभक्तीची अनुभूती दिल्लीकर प्रेक्षकांनी अनुभवली. दिल्ली मराठी प्रतिष्ठानच्या (Delhi marathi prathisthan) वतीने रणदीप हुड्डा (Randeep hooda) यांच्या ‘स्वातंत्र्य वीर सावरकर’ या मराठी चित्रपटाचा विशेष शो आयोजित करण्यात आला. महादेव रोडवरील फिल्म्स डिव्हिजन ऑडिटोरियम येथे आयोजित या प्रक्षेपणाला दिल्लीकर मराठी प्रेक्षकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. (Swatantrya Veer Savarkar)

(हेही वाचा- वंचितकडून Vasant More यांच्या उमेदवारीमागे शरद पवार?)

देशाच्या एका महान सुपुत्राच्या जीवनावर आधारित चित्रपट पाहण्यासाठी दिल्लीकर कमालीचे उत्सुक होते. कुटुंबातील तरुण व लहान मुलांना सोबत घेऊन दिल्लीकरांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला. या वेळी दिल्ली मराठी प्रतिष्ठानचे वैभव डांगे, अभिजित गोडबोले, अभिजित पाठक, प्रवीर चित्रे यांच्यासह अनेक पदाधिकारी उपस्थित होते. (Swatantrya Veer Savarkar)

येथे चित्रपट पहायला आलेल्यांपैकी एक प्रेक्षक सोनाली पाठक म्हणाल्या की, तुम्ही मराठी कुटुंबात जन्माला आले असाल, तर तुमच्यावर लहानपणापासून सावरकरांच्या विचारांचे संस्कार हे केले जातातच. महाराष्ट्रात अशी कित्येक घरे आहेत, त्या घरांमध्ये माझी जन्मठेप, 1857 चा लढा ही वीर सावरकरांची पुस्तक सर्रासपणे पाहायला मिळतात. मात्र आजची पिढी पुस्तके वाचत नाही. सावरकर त्यांना समजणार कसे, असा प्रश्न कित्येकांना पडतो. यासाठी एक उत्तम पर्याय म्हणजे ‘स्वातंत्र्यवीर सावरकर’ हा चित्रपट ! (Swatantrya Veer Savarkar)

(हेही वाचा- Lok Sabha Election 2024: राज्यात ओपिनियन आणि एक्झिट पोलला निवडणूक कालावधीत प्रतिबंध)

स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्या क्रांतीकार्यातील महत्त्वाच्या घटना, उदा. सशस्त्र क्रांतीचा सखोल अभ्यास, लंडनमध्ये जाऊन सावरकरांनी केलेला अभ्यास, इंडिया हाऊसमध्ये केलेले कार्य, मार्सेलिस बेटावर समुद्रात बोटीतून घेतलेली उडी, अभिनव भारतासाठी दिलेले बलीदान, गांधी विरुद्ध सावरकर वैचारिक युद्ध, अंदमानात भोगावी लागलेली काळ्या पाण्याची शिक्षा, अशा महत्त्वाच्या घटना या चित्रपटात पहायला मिळतात. (Swatantrya Veer Savarkar)

सावरकरांच्या जीवनातील या सर्व महत्त्वाच्या घटना तीन तासांमध्ये बसवणं अतिशय कठीण कार्य होतं. हे कार्य करण्याचा एक चांगला प्रयत्न दिग्दर्शक म्हणून रणदीप हुड्डा (Randeep hooda) यांनी केला आहे. हा चित्रपट प्रेक्षकांना खिळवून ठेवतो. प्रसंगी प्रेक्षकांच्या अंगावर शहारा आणतो. सर्वात महत्त्वाचं म्हणजे रणदीप हुड्डा सावरकरांची भूमिका जगला आहे. प्रत्येक सीनमध्ये त्याने स्वतःला झोकुन दिलं आहे, असेही काही प्रेक्षकांनी सांगितले. (Swatantrya Veer Savarkar)

(हेही वाचा- UBT Lok sabha Candidate: उबाठा गटाची दुसरी यादी जाहीर; कल्याणमधून कोण देणार महायुतीला टक्कर)

या शिवाय दिल्लीतील वेगवेगळ्या चित्रपटगृहांमध्ये दाखविण्यात येणाऱ्या स्वातंत्र्य वीर सावरकर (Swatantrya Veer Savarkar) चित्रपटाच्या हिंदी आवृत्तीला देखील प्रेक्षकांचा उत्तम प्रतिसाद मिळत आहे. खासकरून बच्चे कंपनीला सोबत घेऊन चित्रपट बघणाऱ्यांची संख्या सर्वाधिक आहे. (Swatantrya Veer Savarkar)

हेही पहा- 

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.