वंचितकडून Vasant More यांच्या उमेदवारीमागे शरद पवार?

Mahayuti विरुद्ध Mahavikas Aghadi अशी एकास एक लढत होण्याऐवजी आता तिरंगी लढत होणार. 

153
वंचितकडून Vasant More यांच्या उमेदवारीमागे शरद पवार?

पुणे लोकसभा मतदारसंघातून वसंत मोरे (Vasant More) यांना वंचित बहुजन आघाडीकडून उमेदवारी मिळाली. यामुळे आता पुण्यात तिरंगी लढत होणार असल्याचे स्पष्ट झाले असून मोरे यांच्या उमेदवारीमुळे महायुतीचे उमेदवार मुरलीधर मोहोळ यांना महाविकास आघाडीच्या मतविभागणीचा फायदा होणार की ते मोहोळ यांच्या हक्काची हिंदुत्ववादी मते मोरे खाणार, याबाबत संभ्रम निर्माण झाला आहे. तर मोरे यांची ‘वंचित’ उमेदवारी ही राष्ट्रवादी काँग्रेसचे शरद पवार यांची राजकीय खेळी तर नाही ना? अशी चर्चा राजकीय वर्तुळात होत आहे. (Vasant More)

अखेर वंचित

मोरे यांनी मनसेपासून फारकत घेतल्यानंतर शरद पवार यांची यांची भेट घेतली आणि पुढील वाटचालीबाबत चर्चा केली. त्यानंतर त्यांनी शिवसेना उबाठाचे प्रवक्ते संजय राऊत यांचीही भेट घेतली. त्याचप्रमाणे त्यांनी काँग्रेस नेत्यांशीही त्यांची चर्चा सुरू होती. या तीनही पक्षांकडून उमेदवारी न मिळाल्याने अखेर त्यांनी वंचित बहुजन आघाडीचे प्रकाश आंबेडकर यांना भेटून आपली व्यथा मांडली. (Vasant More)

वंचितचा बारामतीत राष्ट्रवादीला पाठींबा

मोरे यांना उमेदवारी देण्याची इच्छा शरद पवार यांची होती, मात्र पुणे मतदार संघ काँग्रेसकडे असल्याने त्यांनीच वंचितच्या माध्यमातून मोरे यांना उमेदवारी मिळवून दिली. यामुळे वंचितला पुण्यात एक तगडा उमेदवार मिळाला आणि त्या बदल्यात वंचितने पवारकन्या सुप्रिया सुळे यांना बारामती लोकसभा मतदार संघात पाठिंबा देत, सुळेंच्या विरोधात उमेदवार न देण्याचा निर्णय घेतला, असे बोलले जात आहे. (Vasant More)

(हेही वाचा – GONDIA: बालाघाट येथे नक्षलवादी आणि जवानांमध्ये चकमक, लाखोंचे बक्षीस असलेल्या २ नक्षलवाद्यांचा खात्मा)

‘X’ वर ट्रोल

वंचित बहुजन आघाडीत पक्षप्रवेश केल्यानंतर मोरे यांनी प्रकाश आंबेडकर यांच्यासोबतचा एक फोटो ‘X’ वर पोस्ट केला. त्यावर नेटकऱ्यांनी त्यांना प्रचंड ट्रोल केले आणि ‘तुम्ही चुकलात’ अशा भावना व्यक्त केल्या. त्यांच्या उमेदवारीमुळे महाविकास आघाडीच्या उमेदवाराचे म्हणजेच काँग्रेसचे रवींद्र धंगेकर यांचे नुकसान होऊन काँग्रेसच्या मतविभागणीचा फायदा भाजपाला होईल, अशी काही नेटकऱ्यांनी शंका व्यक्त केली. (Vasant More)

तिरंगी लढत

पुणे लोकसभा मतदार संघात महायुतीकडून भाजपाचे मुरलीधर मोहोळ, महाविकास आघाडीकडून काँग्रेसचे रवींद्र धंगेकर तर आता वंचितकडून वसंत मोरे यांच्या उमेदवारीमुळे महायुती विरुद्ध महाविकास आघाडी अशी एकास एक लढत होण्याऐवजी आता तिरंगी लढत होणार असल्याचे स्पष्ट झाले आहे. (Vasant More)

हेही पहा –

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.