Gauri Lankesh हत्या प्रकरणातील आरोपीचा जामीन रद्द करण्याची याचिका सर्वोच्च न्यायालयाने फेटाळली

79

पत्रकार गौरी लंकेश (Gauri Lankesh) यांच्या 2017 च्या खून खटल्यातील आरोपी मोहन नायक एन यांना दिलेला जामीन रद्द करण्याची मागणी करणारी याचिका सर्वोच्च न्यायालयाने फेटाळून लावली. न्यायमूर्ती बेला एम त्रिवेदी आणि न्यायमूर्ती सतीश चंद्र शर्मा यांच्या खंडपीठाने नायक यांना दिलेला जामीन रद्द करण्यास नकार देताना आरोपीने खटल्याला सहकार्य केले. मोहन नायक 18 जुलै 2018 पासून कोठडीत होते.

तथापि, न्यायालयाने असेही म्हटले की, ट्रायल कोर्ट या प्रकरणाचा खटला त्वरीत चालवेल आणि सर्व पक्ष खटला पूर्ण करण्यासाठी ट्रायल कोर्टाला सहकार्य करतील. आम्ही उच्च न्यायालयाने दिलेल्या स्पष्ट आदेशामध्ये हस्तक्षेप करण्यास इच्छुक नाही. जर आरोपीने या प्रकरणात सहकार्य केले नाही किंवा अनावश्यक स्थगिती मागितली तर त्याचा जामीन रद्द करण्यासाठी अर्ज दाखल करता येईल. खटला सुरु असताना जर प्रतिवादीने सहकार्य केले नाही, त्यांनी खटला चालवण्यास अनावश्यक स्थगिती मागितली किंवा कोणत्याही अटीचा भंग केला, तर कर्नाटक राज्य किंवा तक्रारदार यांना जामीन रद्द करण्यासाठी अर्ज करण्यास स्वातंत्र्य असेल आणि जर असा कोणताही अर्ज दाखल केला गेला असेल, तर तो त्यावर गुणवत्तेच्या आधारावर सुनावणी केली जाईल, असेही न्यायालयाने म्हटले.

(हेही वाचा Kolkata Rape Case मध्ये नवा ट्विस्ट! आरोपी संजय रॉयचा सहाय्यक पोलीस निरिक्षकासोबतचा सेल्फी व्हायरल)

कर्नाटक सरकार आणि गौरी लंकेश यांची बहीण कविता लंकेश यांनी या प्रकरणातील एक आरोपी नायक याला जामीन मंजूर करण्याच्या 7 डिसेंबर 2023 रोजीच्या कर्नाटक उच्च न्यायालयाच्या आदेशाला आव्हान देत सर्वोच्च न्यायालयात धाव घेतली होती. गौरी लंकेश (Gauri Lankesh) यांची बेंगळुरू येथे 5 सप्टेंबर 2017 रोजी त्यांच्या घराबाहेर गोळ्या झाडून हत्या करण्यात आली होती. या प्रकरणी पोलिसांनी 18 जणांना अटक केली होती.

 

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.