Sunita Williams Astronaut सुनीता विल्यम्स यांची अंतराळवीर मोहीम रद्द! अंतराळयानात बसताच तिसऱ्या मिनिटाला…

178
Sunita Williams Astronaut सुनीता विल्यम्स यांची अंतराळवीर मोहीम रद्द! अंतराळयानात बसताच तिसऱ्या मिनिटाला...
Sunita Williams Astronaut सुनीता विल्यम्स यांची अंतराळवीर मोहीम रद्द! अंतराळयानात बसताच तिसऱ्या मिनिटाला...

भारतीय वंशाच्या अंतराळवीर सुनीता विल्यम्स (Sunita Williams Astronaut) अंतराळयान मोहीम आजही अपयशी ठरली आहे. अवकाशात झेपावणार त्याआधीच त्यांचं यानात तांत्रिक बिघाड झाल्याने मोहिमेच्या तीन मिनिटांआधी ही मोहिम रद्द करावी लागली आहे. या महिन्यातील ही दुसरी घटना आहे. दरम्यान, सुनिता विल्यम्स आणि त्यांचे बुच विल्मोर हे सुरक्षित आहेत. (Sunita Williams Astronaut)

(हेही वाचा –Lok Sabha Election 2024: बारामतीत पोस्टर वॉर! सुप्रिया सुळेंनंतर आता सुनेत्रा पवार यांच्या विजयाचे बॅनर्स)

बोईंग स्टारलाईनर प्रक्षेपणाच्या अवघ्या ३.५१ सेकंदापूर्वी बंद पडले. अवकाश यानात झेप घेण्यासाठी सुनिता विल्यम (Sunita Williams Astronaut) आणि बुच विल्मोर नवीन बोईंग स्टारलाईन या अंतराळ यानात बसले होते. शनिवारी रात्री १० वाजता अमेरिकेच्या फ्लोरिडा येथून अॅटलस व्ही रॅकेटचा वापर करून ते अंतराळयानातून गगनझेप घेणार होते. परंतु, प्रक्षेपणाच्या काही मिनिटे आधीच तांत्रिक बिघाड झाल्याने ही मोहिमही आता पुढे ढकलण्यात आली आहे. (Sunita Williams Astronaut)

(हेही वाचा –PUNE: हडपसर परिसरात कोयता गँगचा धुमाकूळ, दुकानांची तोडफोड; वाचा नक्की काय घडले?)

७ मे रोजीही ही नियोजित मोहीम अपयशी ठरली होती. आता या मोहिमेच्या नव्या प्रक्षेपणासाठी जवळपास २४ तास लागतील. परंतु, नव्या मोहिमेची वेळ अद्याप जाहीर केलेली नाही. ग्राउंड लॉन्च सिक्वेन्सर आणि रॉकेटवर लक्ष ठेवणाऱ्या संगणकाद्वारे तांत्रिक त्रुटी आढळून आली. अंतराळवीर आता स्टारलाइनर कॅप्सूलमधून बाहेर पडतील आणि केनेडी स्पेस सेंटरमधील क्रू क्वार्टरमध्ये परत येतील. (Sunita Williams Astronaut)

(हेही वाचा –Mumbai Rain: मुंबईमध्ये कधी होणार पावसाचं आगमन? हवामान खात्याने तारिख सांगितली…)

स्टारलाइनर अंतराळयानावर सुनीता प्रशिक्षण (Sunita Williams Astronaut) घेत होत्या. यानाच्या विकासातील अडथळ्यांमुळे मोहीम प्रलंबित होती. जुलै २०२२मध्ये स्टारलाइनर या नव्या यानातून अंतराळवीर अवकाशात जाणार होते, मात्र करोनामुळे ही मोहीम पुढे ढकलण्यात आली होती. २००६ आणि २०१२ मध्ये त्यांनी अंतराळात प्रवास केला होता. या दोनही मोहिमांमध्ये एकूण ३२२ दिवस त्यांनी अंतराळात घालवले होते. हा विक्रम मानला जात आहे. त्यामुळे यावेळेस त्या तिसऱ्यांदा अंतराळात जाणार आहेत. (Sunita Williams Astronaut)

हेही पहा –

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.