Sunil Deodhar : पुण्याचे प्रश्न सोडवण्याचा मी पूर्ण ताकदीने प्रयत्न करणार

तुमच्या काही गंभीर समस्या असतील तर त्या पीएमओला लिहा, त्या सुटतीलच याची खात्री आहे. कारण ते नरेंद्र मोदी आहेत. प्रत्येकाच्या प्रश्नाला न्याय देण्याचे काम मागील १० वर्षांत त्यांच्या सरकारने केले असून नरेंद्र मोदी बहुमताने पुन्हा एकदा देशाचे पंतप्रधान व्हावेत.

138
Sunil Deodhar : पुण्याचे प्रश्न सोडवण्याचा मी पूर्ण ताकदीने प्रयत्न करणार

हाती घ्याल ते तडीस न्या शिकवण मला मिळाली आहे. सद्य:स्थितीत पुण्याच्या विकासाबाबत नियोजना पातळीवर गोंधळाची स्थिती जावणते. येणाऱ्या काळात पुण्याच्या स्थानिक प्रश्नांचे योग्य व सर्वंकष निराकरण होईल, यासाठी सर्वार्थाने प्रयत्न करणार असल्याचा विश्वास भाजपचे नेते सुनील देवधर (Sunil Deodhar) यांनी व्यक्त केला.

(हेही वाचा – PM Narendra Modi : लोकसभा निवडणुकीसाठी भाजपाने आखली मोहीम; पंतप्रधान मोदी येत्या १० दिवसांत करणार १२ राज्यांचा दौरा)

‘एका पेक्षा एक नूमविय’ मुलाखत :

गंज पेठेतील ज्ञानज्योती सावित्रीबाई फुले सभागृहात ‘एका पेक्षा एक नूमविय’ (नूतन मराठी विद्यालय) या रंगतदार मुलाखतीचे आयोजन करण्यात आले होते. नूमविचे माजी विद्यार्थी असलेले भारतीय जनता पक्षाचे नेते सुनील देवधर (Sunil Deodhar) यांची प्रकट मुलाखत, शाळेचे दुसरे माजी विद्यार्थी सुप्रसिद्ध मुलाखतकार सुधीर गाडगीळ यांनी घेतली.

पुण्याचे प्रश्न सोडवण्याचा मी पूर्ण ताकदीने प्रयत्न करणार :

पुण्यात जन्मलो, इथेच नूमवित शिकलो, महाविद्यालयीन शिक्षणानंतर एवढे दिवस देशभरात विविध ठिकाणी काम केले असून, आता पुण्यात राहून काम करणार आहे. मागील काही वर्षांत पुण्याचे अनेक प्रश्न सुटू शकलेले नाहीत. स्व. गिरीश बापट हे एक उत्तम लोकप्रतिनिधी होते, परंतु त्यांच्या आजारपणामुळे काही गोष्टी करणे शक्य झाल्या नाहीत. त्यामुळे मागील काही वर्षापासून प्रलंबित राहिलेले पुण्याचे अनेक प्रश्न आहेत. काही स्थानिक आहेत, काही राज्य पातळीवरील तर काही देश पातळीवरील प्रश्न आहेत. हे प्रश्न सोडवण्याचा मी पूर्ण ताकदीने प्रयत्न करणार आहे. कारण, मला पुण्येश्वराने पुण्यात बोलावले असून, पुण्याच्या प्रश्नांना प्राधान्य देणार असल्याचे, सुनील देवधर (Sunil Deodhar) यावेळी म्हणाले.

(हेही वाचा – Chhagan Bhujbal: कोण कशाला घात करेल, सगळी नाटकं मराठा समाजाला समजली, छगन भुजबळांचा जरांगेंवर हल्लाबोल)

पुन्हा एकदा बहुमताने नरेंद्र मोदी देशाचे पंतप्रधान व्हावेत :

तुमच्या काही गंभीर समस्या असतील तर त्या पीएमओला लिहा, त्या सुटतीलच याची खात्री आहे. कारण ते नरेंद्र मोदी आहेत. प्रत्येकाच्या प्रश्नाला न्याय देण्याचे काम मागील १० वर्षांत त्यांच्या सरकारने केले असून नरेंद्र मोदी बहुमताने पुन्हा एकदा देशाचे पंतप्रधान व्हावेत, याकरिता भारतीय जनता पक्ष विजयी झाला पाहिजे. यासाठी आम्ही सर्वजण समर्पित भावनेने काम करत आहोत. इथे पक्ष सांगेल तो आदेश मान्य आहे, अशी भूमिका देखील देवधर यांनी मांडली. मुलाखतकार सुधीर गाडगीळ यांनी सुनील देवधर यांना, त्यांच्या आजवरच्या एकूण राजकीय आणि सामाजिक जीवनातील घडामोडींवर प्रश्न विचारले, ज्याची देवधर (Sunil Deodhar) यांनी दिलखुलासपणे उत्तरे दिली.

हेही पहा – 

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.