ज्येष्ठ पत्रकार महेश म्हात्रे यांना माथेरान प्रेस क्लबचा राज्यस्तरीय पुरस्कार जाहीर

76
ज्येष्ठ पत्रकार महेश म्हात्रे यांना माथेरान प्रेस क्लबचा राज्यस्तरीय पुरस्कार जाहीर

२०२१ पासून देण्यात येणारा संतोष पवार स्मृती राज्यस्तरीय पत्रकारिता पुरस्कार २०२४ (Santosh Pawar Memorial State Level Journalism Award 2024)ची घोषणा माथेरान प्रेस क्लबने (Matheran Press Club) केली आहे. यामध्ये ज्येष्ठ पत्रकार महेश म्हात्रे यांना हा पुरस्कार जाहीर झाला असून, म्हात्रे यांच्या सोबत आणखी दोन पत्रकारांना पुरस्कार जाहीर झाला आहे. पुरस्कार वितरण सोहळा २५ एप्रिल रोजी माथेरान येथील प्रीती हॉटेल येथे संध्याकाळी ०५ वाजून ३० मिनिटांनी होणार आहे. तर या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी मराठी पत्रकार परिषदेचे मुख्य विश्वस्त एस. एम. देशमुख असणार आहेत. (Mahesh Mhatre)

(हेही वाचा – Lok Sabha Election 2024 : माढ्यात महाविकास आघाडीला मोठा धक्का)

ज्येष्ठ पत्रकार महेश म्हात्रे (Senior Journalist Mahesh Mhatre) यांच्यासोबत खोपोलीचे ज्येष्ठ पत्रकार भाई ओव्हळ (Senior journalist Bhai Oval) यांना सुनील दांडेकर स्मृती रायगड जिल्हास्तरीय पत्रकारिता पुरस्कार आणि माथेरानचे पत्रकार अजय कदम (Ajay kadam) यांना धर्मानंद गायकवाड तालुकास्तरीय पुरस्काराने सन्मानित करण्यात येणार आहे. (Mahesh Mhatre)

(हेही वाचा – Lok Sabha Election 2024: ईव्हीएम मशीनद्वारे केलेले मतदान १०० टक्के सुरक्षित, निवडणूक आयुक्त राजीव कुमार यांनी दिले मतदारांना आश्वासन)

माथेरानस्थित पत्रकार संतोष पवार यांचे कोरोनाच्या संसर्गाने २०२० मध्ये निधन झाले. त्यानंतर माथेरान प्रेस क्लबने २०२१ पासून संतोष पवार स्मृती राज्यस्तरीय पत्रकारिता पुरस्कार सुरू केला. ज्येष्ठ पत्रकार महेश म्हात्रे यंदा या पुरस्काराचे मानकरी ठरले आहेत. (Mahesh Mhatre)

(हेही वाचा – Pak vs NZ T20 Series : पावसापासून संरक्षणासाठी पाकमधील स्टेडिअमवर प्लास्टिक शिटचा वापर)

कर्जत प्रेस क्लब व माथेरान प्रेस क्लब यांच्यासोबत संलग्न असणाऱ्या रायगड प्रेस क्लबने हा पुरस्कार वितरण समारंभ आयोजित केला आहे. या कार्यक्रमाचे सूत्रसंचलन निवेदक भूषण करंदीकर करणार आहेत. तर या पुरस्कार वितरण समारंभात मॅक्स महाराष्ट्राचे संपादक रवींद्र आंबेकर, मराठी पत्रकार परिषदेचे कार्याध्यक्ष मिलिंद आष्टीवकर, जेष्ठ वृत्त निवेदक भूषण करंदीकर व रायगड प्रेस क्लबचे अध्यक्ष मनोज खांबे हे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित राहणार आहेत. (Mahesh Mhatre)

हेही पाहा – 

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.