Amit shah यांनी दाखल केला उमेदवारी अर्ज

शाह यांच्यासोबत मुख्यमंत्री आणि इतर दिग्गज भाजप नेते उपस्थित

114
Amit shah यांनी दाखल केला उमेदवारी अर्ज

देशात लोकसभा निवडणुकीसाठी शुक्रवारी पहिल्या टप्प्यातील मतदान सुरू असतानाच केंद्रीय गृहमंत्री अमित शाह (Central Minister Amit Shah) यांनी गुजरातच्या गांधीनगर लोकसभा (Gandhi nagar Lok sabha 2024) मतदारसंघातून उमेदवारी अर्ज दाखल केला आहे. यावेळी शाह यांच्यासोबत मुख्यमंत्री आणि इतर दिग्गज भाजप नेते उपस्थित होते. (Amit shah)

(हेही वाचा – Lok Sabha Election 2024: मतदान करणाऱ्यांना टाटा एअरलाइन्सची विशेष ऑफर, सवलतीचा फायदा कसा घ्याल? ) 

उमेदवारी अर्ज दाखल केल्यानंतर अमित शाह म्हणाले की, गांधीनगर मतदारसंघात खुद्द पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) मतदार आहेत. शिवाय लालकृष्ण अडवाणी, अटल बिजारी वाजपेयी यांनी या मतदारसंघाचे नेतृत्व केले आहे. मी गेली ३० वर्षे या मतदारसंघातून आमदार आणि खासदार राहिलो आहे, ही माझ्यासाठी अभिमानाची बाब आहे. ‘या निवडणुकीत नरेंद्र मोदींना प्रचंड बहुमताने तिसऱ्यांदा पंतप्रधान करण्यासाठी संपूर्ण देश उत्सुक आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली देशाने संपूर्ण नावलौकिक मिळवले आहे. (Amit shah)

(हेही वाचा – Navneet Rana: “सीतेला पण भोग चुकले नाही, आपण तर..” राऊतांच्या टीकेवर नवनीत राणांचा घणाघात )

यूपीए सरकारने निर्माण केलेली पोकळी भरण्यासाठी जनतेने आम्हाला १० वर्षे दिली, आता पुढील ०५ वर्षात विकसित भारताचा पाया उभारायचा आहे. मी देशातील मतदारांना आवाहन करतो की, प्रचंड बहुमताने सर्वत्र कमळ फुलवा.’ गांधीनगर लोकसभा जागेसाठी आगामी ०७ मे रोजी मतदान (Voting on 07 May) होणार आहे. (Amit shah)

हेही पाहा – 

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.