SSC Result 2024 : महाराष्ट्र मिलिटरी स्कूलचा दहावीचा निकाल 100 टक्के

SSC Result 2024 : शाळेतील 100 टक्के विद्यार्थी विविध शालेय उपक्रम, शाळांतर्गत स्पर्धा, तसेच विविध खेळांमधून राज्य व राष्ट्रीय स्तरावरील स्पर्धांमध्ये प्रतिनिधीत्व करत असून, तिथेही त्यांची उत्तम कामगिरी आहे.

473
SSC Result 2024 : महाराष्ट्र मिलिटरी स्कूलचा 100 टक्के निकाल
SSC Result 2024 : महाराष्ट्र मिलिटरी स्कूलचा 100 टक्के निकाल

ठाणे जिल्ह्यातील स्वातंत्र्यवीर सावरकर सेवा समिती द्वारा संचलित महाराष्ट्र मिलिटरी स्कूल (Maharashtra Military School) या निवासी सैनिकी शाळेचा शालांत प्रमाणपत्र परीक्षेचा दहावीचा मार्च 2024 मधील निकाल शतप्रतिशत (100 टक्के) लागला आहे. सर्वाधिक विद्यार्थ्यांनी विशेष प्राविण्य मिळविले आहे. गेल्या 17 वर्षांमधील उज्वल यशाची परंपरा विद्यार्थ्यांनी कायम राखली आहे. विद्यार्थी राज विवेक तांबे याने 89 टक्के प्राप्त करून प्रथम क्रमांक पटकावला आहे.

SSC Result 2024 : महाराष्ट्र मिलिटरी स्कूलचा दहावीचा निकाल 100 टक्के
SSC Result 2024 : महाराष्ट्र मिलिटरी स्कूलचा दहावीचा निकाल 100 टक्के

(हेही वाचा – Britain : ब्रिटनच्या सार्वत्रिक निवडणुकीपूर्वी 78 खासदारांची राजकारणातून निवृत्ती)

स्पर्धांमध्येही उत्तम कामगिरी

या शिवाय शाळेतील 100 टक्के विद्यार्थी विविध शालेय उपक्रम, शाळांतर्गत स्पर्धा, तसेच विविध खेळांमधून राज्य व राष्ट्रीय स्तरावरील स्पर्धांमध्ये प्रतिनिधीत्व करत असून, तिथेही त्यांची उत्तम कामगिरी आहे. या विद्यार्थ्यांचे अभिनंदन विद्यालयाचे प्राचार्य काशिनाथ भोईर सर, तसेच संस्थेचे अध्यक्ष सूर्यकांत पाटील सर, कार्यवाह रणजित सावरकर सर, कोषाध्यक्ष सुरेश जाधव सर यांनी केले आहे.

शाळेची सध्या प्रवेश प्रक्रिया सुरु असून पाचवी ते सहावीसाठी मोजक्याच जागा उपलब्ध आहेत. तरी इच्छुकांना प्रवेश घेता येईल, अशी माहितीही प्राचार्य भोईर यांनी दिली आहे.

हेही पहा – 

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.