Ukhane in Marathi for Male : नवरदेवाचे पारंपरिक नवे उखाणे

158

नवरदेवाचे उखाणे म्हटले की ते मराठीतच (Ukhane in Marathi for Male) असायला हवे. असेच काही मराठी उखाणे नवरदेवाचे खास करून तुमच्यासाठी मांडले आहेत.

  • १. पुरणपोळीत तूप असावे साजूक, ….आहेत आमच्या नाजूक
  • २. काही शब्द येतात ओठातून,….चं नाव मात्र येतं हृदयातून
  • ३. कोल्हापुरला आहे महालक्ष्मीचा वास….ला भरवितो श्रीखंडाचा घास
  • ४. सीतेसारखे चरित्र, लक्ष्मीसारखे रूप, मला मिळाली आहे…..अनुरूप
  • ५. संसाररूपी सागरात पतीपत्नीची नौका….चं नाव घेतो सर्वांनी ऐका
  • ६. दुर्वांची जुडी वाहतो गणपतीला, सौ……सारखी पत्नी मिळाली आनंद झाला मला
  • ७. मोह नाही, माया नाही, नाही मत्सर हेवा…..चं नाव घेतो जरा लक्ष ठेवा
  • ८. नाशिकची द्राक्षे, नागपूरची संत्री, …..झाली आज माझी गृहमंत्री
  • ९. जन्म दिला मातेने, पालन केले पित्याने, …..च्या गळ्यात मंगळसूत्र बांधतो प्रेमाने
  • १०. सनई चौघडा वाजतो सप्तसुरात, ….चे नाव घेतो…च्या घरात

 

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.