SSC Result 2024: यंदाही मुलींनीच मारली बाजी; राज्यात दहावीचा निकाल ९५.८१ टक्के

161
SSC Result 2024 : महानगरपालिका शाळांचे विद्यार्थी हुशार, दहावीचा परीक्षेचा निकाल ९१.५६ टक्के

महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाकडून घेण्यात आलेल्या दहावी परीक्षेचा निकाल जाहीर (SSC Result 2024) करण्यात आला आहे. दहावीचा यंदाचा एकूण निकाल 95.81 टक्के इतका लागला आहे. यंदाच्या निकालामध्ये कोकण विभागानं (99.01 टक्के) बाजी मारली असून नागपूर विभाग शेवटी आहे. (SSC Result 2024)

मुलांचा निकाल 94.56 टक्के

नागपूर विभाग 94.73 टक्क्यांसह राज्यातील विभागनिहाय टक्केवारीनुसार सर्वात खाली आहे. तर निकालांमध्ये पुन्हा एकदा मुलींनी बाजी मारली आहे. मुलींचा निकाल 97.21 टक्के तर मुलांचा निकाल 94.56 टक्के लागला आहे. आकडेवारीनुसार, सर्वच विभागांमध्ये मुलींनी बाजी मारली आहे. एकूण 72 विषयांपैकी 18 विषयांचा 100 टक्के लागला आहे. दहावीच्या एकूण विद्यार्थ्यांच्या निकालाची एकूण टक्केवारी 94.86 टक्के इतकी आहे. (SSC Result 2024)

दहावीच्या परीक्षेसाठी नोंदणी करणाऱ्या विद्यार्थ्यांच्या संख्येत वाढ

निकाल जाहीर (SSC Result 2024) करण्यापूर्वी महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्यावतीनं पत्रकार परिषद घेण्यात आली. पत्रकार परिषदेतून निकालासंदर्भातील ठळक माहिती देण्यात आली आहे. शैक्षणिक वर्ष 2023 -2024 मध्ये दहावीच्या परीक्षेसाठी नोंदणी करणाऱ्या विद्यार्थ्यांच्या संख्येत वाढ झाली आहे. दहावीच्या परीक्षेसाठी 16 लाख 9 हजार 544 विद्यार्थ्यांनी नोंदणी केली आहे. या सर्व विद्यार्थ्यांसह पालकांचीही निकालाची (SSC Result 2024) उत्सुकता शिगेला पोहोचली आहे. आता दुपारी एक वाजता बोर्डाच्या अधिकृत वेबसाईटवर निकाल जाहीर केले जाणार आहेत. विद्यार्थ्यांना एक वाजल्यापासून निकाल पाहता येतील, तसेच, निकालाची प्रत विद्यार्थी डाऊनलोडही करू शकणार आहेत. (SSC Result 2024)

९१४९ दिव्यांग विद्यार्थ्यांनी नोंदणी

या परीक्षेस राज्यातील नऊ विभागीय मंडळामधून एकूण ९१४९ दिव्यांग विद्यार्थ्यांनी नोंदणी केली होती. त्यापैकी ९०७८ दिव्यांग विद्यार्थी परीक्षेस प्रविष्ट झाले असून त्यापैकी ८४६५ दिव्यांग विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत व त्यांची एकूण उत्तीर्णतेची टक्केवारी ९३.२५ आहे.

हेही पहा –

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.