Remal Cyclone बंगालला धडकले! राज्यात परिस्थिती काय?

140
Remal Cyclone बंगालला धडकले! राज्यात परिस्थिती काय?
Remal Cyclone बंगालला धडकले! राज्यात परिस्थिती काय?

बंगालच्या उपसागरात तयार झालेलं चक्रीवादळ रेमल (Remal Cyclone) आज पश्चिम बंगाल आणि बांगलादेशच्या किनारपट्टीला धडकलं आहे. या चक्रीवादळाचा (Remal Cyclone) फटका पश्चिम बंगाल किनारपट्टी भागाला जाणवतोय. वादळी वाऱ्यांसह जोरदार पाऊस पडतोय. किनारपट्टी भागात वाऱ्यांचा वेग 100 ते110 किमी होता. तसंच अनेक भागात झाडं कोसळली आहेत. उत्तर दिशेने चक्रीवादळाचा प्रवास सुरू आहे. मात्र जमिनीवरील प्रवास सुरू झाल्याने कमी दाबाच्या पट्ट्याचा जोर ओसरत जाईल असं भारतीय हवामान खात्याने सांगितलं आहे. (Remal Cyclone)

घरे उद्ध्वस्त

किनारपट्टी भागातल्या 1 लाख 10 हजार लोकांचं स्थलांतर करण्यात आलं आहे. पंतप्रधान मोदींनीही चक्रीवादळाच्या स्थितीचा आढावा घेतला. रेमल चक्रीवादळ (Remal Cyclone) रविवारी रात्री 8.30 वाजता किनारपट्टीवर धडकण्यास सुरुवात झाली. त्यावेळी हे वादळ किनारपट्टीपासून 30 किमी दूर होते. मात्र, हळूहळू ते जवळ आले आणि पश्चिम बंगाल (West Bengal) आणि बांगलादेशच्या किनारपट्टीला धडकले. रेमल वादळामुळे (Remal Cyclone) लाकडाची किंवा बांबूची घरे उद्ध्वस्त झाली. वाऱ्याचा वेग इतका होता की झाडेही उन्मळून पडली. अनेक किनारी भागात विजेचे खांबही उन्मळून पडल्याचे दिसून आले. सुंदरबनमधील गोसाबा परिसरात ढिगाऱ्याखाली येऊन एक जण जखमी झाल्याची माहिती समोर आली आहे. दिघा येथील किनारपट्टीवर उंच लाटा उसळताना दिसत आहेत. रेमलमुळे पश्चिम बंगालच्या संपूर्ण किनारपट्टी भागात जोरदार पाऊस झाला आहे. (Remal Cyclone)

गाड्या रद्द, विमानतळ सेवा बंद 

कोलकात्यासह दक्षिण बंगालच्या जिल्ह्यांमध्ये NDRF च्या 14 तुकड्या तैनात करण्यात आल्या आहेत. राज्य सरकारने एसडीआरएफ टीमही तयार केल्या आहेत चक्रीवादळामुळे (Remal Cyclone) रस्ते आणि विमान प्रवासही प्रभावित झाला आहे. कोलकाता ते दक्षिण बंगालपर्यंतच्या (South Bengal) जिल्ह्यांमध्ये वाहतूक सेवा प्रभावित झाली आहे. पूर्व आणि दक्षिण पूर्व रेल्वेने काही गाड्या रद्द केल्या आहेत. कोलकाताचे (Kolkata) नेताजी सुभाषचंद्र बोस आंतरराष्ट्रीय विमानतळ रविवारी दुपारी 12 ते सोमवारी सकाळी 9 वाजेपर्यंत बंद ठेवण्यात आले आहे. यामुळे 394 उड्डाणे रद्द करण्यात आली आहेत. (Remal Cyclone)

हेही पहा –

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.