SSC अंतर्गत ४५०० पदांसाठी भरती! मिळेल ६० हजारांहून अधिक पगार, येथे करा अर्ज

95

SSC CHSL अंतर्गत लिपिक/कनिष्ठ सचिवालय सहाय्यक, डेटा एंट्री ऑपरेटर पदांसाठी पात्र उमेदवारांकडून ऑनलाईन अर्ज मागवण्यात आले आहेत. अर्ज करण्याची शेवटची तारीख ४ जानेवारी २०२३ आहे.

( हेही वाचा :२०२२ मध्ये गुगलवर ‘हे’ ६ खेळ ठरले सुपरहिट! पहा संपूर्ण यादी… )

पदांसाठी निवड कशी करणार?

SSC CHSL (१०+२) परीक्षेत लोअर डिव्हिजन कर्ल्क, कनिष्ठ सचिवालय सहाय्यक, पोस्टल सहाय्यक, वर्गीकरण सहायक आणि डेटा एंट्री ऑपरेटर या पदांचा समावेश आहे. यामध्ये संगणक-आधारिक चाचणी, वर्णनात्मक पेपर आणि कौशल्य चाचणी किंवा टायपिंग चाचणीद्वारे लिपिक पदांची निवड करण्यात येणार आहे.

पदांचा तपशील

  • कनिष्ठ विभाग लिपिक/कनिष्ठ सचिवालय सहाय्यक
  • डेटा एन्ट्री ऑपरेटर (DEO)
  • डेटा एन्ट्री ऑपरेटर ग्रेड A

अटी व नियम जाणून घ्या…

  • पदसंख्या – ४ हजार ५०० जागा
  • पदाचे नाव – लिपिक/कनिष्ठ सचिवालय सहाय्यक, डेटा एंट्री ऑपरेटर
  • शैक्षणिक पात्रता – १२ वी उत्तीर्ण
  • वयोमर्यादा – १८ ते २७ वर्ष
  • अर्ज शुल्क – १०० रुपये
  • अर्ज पद्धती – ऑनलाईन
  • अर्ज सुरू होण्याची तारीख – ६ डिसेंबर २०२२
  • अर्ज करण्याची शेवटची तारीख – ४ जानेवारी २०२२
  • अधिकृत वेबसाईट – ssc.nic.in

वेतनश्रेणी

  • लिपिक/कनिष्ठ सचिवालय सहाय्यक – १९ हजार ९०० रुपये ते ६३ हजार २००
  • डेटा एंट्री ऑपरेटर – २५ हजार ५०० ते ९२ हजार ३००
  • डेटा एंट्री ऑपरेटर grade ‘A’ – २५ हजार ५०० ते ८१ हजार १००
Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.