SSC HSC Exam : दहावी, बारावीच्या परीक्षेत विद्यार्थ्यांना ‘हा’ फायदा

SSC HSC Exam : पालक, विद्यार्थ्यांच्या मागणीचा विचार करून परीक्षेच्या निर्धारित वेळेपेक्षा दहा मिनिटे जास्तीची दिली जाणार आहेत. गेल्या वर्षी देखील वेळ वाढवून देण्यात आला होता.

405
SSC HSC Exam : दहावी, बारावीच्या परीक्षेत विद्यार्थ्यांना 'हा' फायदा
SSC HSC Exam : दहावी, बारावीच्या परीक्षेत विद्यार्थ्यांना 'हा' फायदा

दहावी (SSC Exam)आणि बारावी बोर्डाची परीक्षा (HSC Exam) देणाऱ्या विद्यार्थ्यांना गेल्या वर्षीप्रमाणे यंदाही फायदा होणार आहे. यावर्षी सुद्धा दहावी-बारावी बोर्डाच्या परीक्षेच्या निर्धारित वेळेनंतर दहा मिनिटे वाढवून दिली जाणार आहेत.

(हेही वाचा – Subramanian Swamy: रामसेतूला राष्ट्रीय वारसा मिळावा म्हणून सर्वोच्च न्यायालयात दाद मागणार, भाजपाचे ज्येष्ठ नेते सुब्रमण्यम स्वामी यांची ‘X’ वर माहिती)

फेब्रुवारी-मार्च 2023 परीक्षेपासून रद्द होती सुविधा

यंदा बारावीची लेखी परीक्षा 21 फेब्रुवारी 2024 ते 23 मार्च 2024 या कालावधीत होणार आहे. दहावीची लेखी परीक्षा 1 मार्च 2024 ते 26 मार्च 2024 या कालवधीत होणार आहे.

दहावी आणि बारावीच्या परीक्षांना शालेय जीवनात मोठे महत्त्व आहे. त्यामुळेच या परीक्षांचा ताण येणे, भीती वाटणे यांसारख्या मानसिक त्रासांनाही विद्यार्थ्यांना सामोरे जावे लागते. परीक्षा निकोप, भयमुक्त व कॉपीमुक्त वातावरणात सुरळीत पार पडाव्यात, यासाठी प्रश्नपत्रिका परीक्षेच्या वेळेच्या आधी 10 मिनिटे वितरित करण्यात येत होत्या.

ही सुविधा फेब्रुवारी-मार्च 2023 परीक्षेपासून रद्द करण्यात आली होती.

(हेही वाचा – Mamata Banerjee : ‘हिंदुस्थान पोस्ट’ची बातमी खरी ठरली; इंडि आघाडीमध्ये सर्वांत मोठी फूट)

यंदा परीक्षेच्या निर्धारित वेळेनंतर 10 मिनिटे मिळणार

उच्च माध्यमिक प्रमाणपत्र (12 वी) व माध्यमिक शालान्त प्रमाणपत्र (10 वी) परीक्षा देणाऱ्या परीक्षार्थ्यांना प्रश्नपत्रिका वाचण्यासाठी (आकलन होण्यासाठी) परीक्षा दालनात प्रश्नपत्रिकांचे वाटप परीक्षेच्या निर्धारित वेळेपूर्वी दहा मिनिटे अगोदर करण्यात येत होते. यंदा विद्यार्थ्यांचे हित लक्षात घेत पालक आणि विद्यार्थ्यांच्या मागणीचा विचार करून दहा मिनिटे परीक्षेच्या निर्धारित वेळेनंतर दिली जाणार आहेत. त्यामुळे सकाळ सत्रात सकाळी 10.30 वाजता, तसेच दुपार सत्रात दुपारच्या सत्रात 2.30 वाजता परीक्षा केंद्रावर उपस्थित रहाणे आवश्यक आहे.

फेब्रुवारी-मार्च 2024 परीक्षांच्या वेळी सकाळी 11.00 वाजता, तसेच दुपार सत्रात दु.3.00 वाजता परीक्षा दालनात प्रश्नपत्रिकाचे वितरण करण्यात येईल आणि लेखनास प्रारंभ होईल. सकाळ सत्रात स. 10.30 वाजता परीक्षार्थ्यांने परीक्षा केंद्रावर उपस्थित राहणे आवश्यक आहे.

परीक्षेचा सध्याचा वेळ परीक्षेची सुधारित वेळ

सकाळी 11 ते दुपारी 2                 सकाळी 11 ते दुपारी 2:10
सकाळी 11 ते दुपारी 1                 सकाळी 11 ते 1:10
सकाळी 11 ते दुपारी 1.30             सकाळी 11 ते दुपारी 1.40    (SSC HSC Exam)

हेही पहा – 

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.