Sri Barabhai Ganapati : अकोल्यातील ‘श्री बाराभाई’ गणपती, मानाच्या मूर्तीचे कधीही विसर्जन होत नाही; जाणून घ्या कारण…

अनेक वर्षांची परंपरा असलेल्या या गणपतीविषयी अकोलेकरांच्या मनात श्रद्धेचे भाव आहेत

88
Sri Barabhai Ganapati : अकोल्यातील 'श्री बाराभाई' गणपती, मानाच्या मूर्तीचे कधीही विसर्जन होत नाही; जाणून घ्या कारण..
Sri Barabhai Ganapati : अकोल्यातील 'श्री बाराभाई' गणपती, मानाच्या मूर्तीचे कधीही विसर्जन होत नाही; जाणून घ्या कारण..

अकोल्यातील जयहिंद चौकातील भगवाननाथ इंगळे यांनी स्थापन केलेला ‘श्री बाराभाई’ गणपती (Sri Barabhai Ganapati)  विदर्भात प्रसिद्ध आहे. ऐतिहासिकदृष्ट्या हा गणपती मानाचा गणपती समजला जातो. लोकमान्य टिळक यांनी सार्वजनिक गणेशोत्सव सुरू केला, तेव्हा अकोला शहर फारच लहान होते. नदीपलीकडे गाव नव्हते. चार वेशीतच गावाची मर्यादा होती. अकोल्यात फक्त पाचच गणेश मंडळे होती. त्यानंतर येथे गणेशोत्सव मोठ्या प्रमाणात होऊ लागला. आज या गणेश मंडळाला शंभर वर्षांपेक्षा जास्त वर्षांची परंपरा लाभली आहे.

श्री बाराभाई गणपतीची स्थापना नेमकी केव्हापासून झाली, याची अद्याप कोणतीही नोंद नाही. या गणपतीचा पेशवेकालिन बाराभाईच्या कटकारस्थानाशी संबंध असू शकेल, यामुळे या गणपतीला “बाराभाई” हे नाव दिले गेले असावे, असे येथील जाणकार सांगतात.

(हेही वाचा – Canada vs India : कॅनडा विरुद्ध भारत वादात अमेरिकेची उडी; भारतावर दबाव वाढण्याची शक्यता)

प्राचीन काळी श्री बाराभाई गणपतीची रुढीपरंपरेने स्थापना केल्या जात होती, मात्र कालांतराने कै.भगवाननाथ इंगळे यांनी आपल्या घरी श्री बाराभाई गणपतीची स्थापना केली. तेव्हापासून श्री बाराभाई गणपती नाथ कुटुंबाचा गणपती म्हणून ओळखला जातो. श्री बाराभाई गणपतीची पालखी वाहणारे भोईराजसुध्दा पिढ्यान् पिढ्या आपली सेवा गणेश चरणी अर्पण करीत आहेत. अनेक वर्षांपासून असलेल्या या गणपतीचे अकोलेकरांच्या मनात श्रद्धेचे भाव आहेत. श्री बाराभाई गणपतीला अनेक जण नवस बोलतात, साकडे घालतात. भक्तांच्या श्रद्धेला आणि विश्वासाला श्री बाराभाई गणपतीने कधीही तडा जाऊ दिला नाही, असे मोठ्या अभिमानाने नाथ कुटुंबीय सांगतात.

मूर्तीचे वैशिष्ट्य…
श्री बाराभाई गणपतीची मूर्ती १०० वर्षांपेक्षा जास्त वर्षे झाली तरीही एकच मूर्ती आहे. याआधी जुन्या पिढीतील मूर्तिकार ओंकारराव मोरे-ठाकूर हे बाराभाई गणपतीची मूर्ती तयार करत होते, पण त्यांना यश आले नाही. त्यांच्या मृत्यूनंतर वारंवार प्रयत्न करूनही श्री बाराभाई गणपतीची मूर्ती तयार करण्यात मूर्तिकारांना यश आले नाही. त्यामुळे या मानाच्या मूर्तीचे कधीही विसर्जन करण्यात येत नाही. फक्त पूजेच्या मूर्तीचे विसर्जन केले जाते.

हेही पहा – 

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.