Special Block : ठाणे स्थानकात गर्डर टाकण्यासाठी विशेष ब्लॉक

लोकल आणि मेल-एक्सप्रेसच्या वाहतुकीत बदल करण्यात आला आहे.

95
Special Block : ठाणे स्थानकात गर्डर टाकण्यासाठी विशेष ब्लॉक
Special Block : ठाणे स्थानकात गर्डर टाकण्यासाठी विशेष ब्लॉक

ठाणे स्थानकात पादचारी पुलाचा पाच मीटर रुंद गर्डर टाकण्यासाठी बुधवारी रात्री वाहतुक आणि पॉवर ब्लॉक (Special Block) घेण्यात येणार आहे. अप -जलद आणि पाचव्या मार्गावर हा ब्लॉक असणार आहे. या काळात लोकल आणि मेल-एक्सप्रेसच्या वाहतुकीत बदल करण्यात आला आहे.

पुलाचा गर्डर टाकण्यासाठी १४० टनाच्या क्रेनचा वापर करण्यात येणार आहे. बुधवारी रात्री अप ट्रान्स हार्बर मार्ग आणि ५ व्या रेल्वे मार्गावर तसेच ठाणे स्थानकातील फलाट ६ आणि ७ वर रात्री ११.५५ पासून गुरुवारी पहाटे ४.५५ वाजेपर्यत ब्लॉक राहणार आहे. मुंबईतून जाणाऱ्या मुंबई- मडगाव, लोकमान्य टिळक टर्मिनस- पाटलीपुत्र एक्सप्रेस, दादर-सावंतवाडी एक्सप्रेस, लोकमान्य टिळक टर्मिनस-पुरी एक्सप्रेस, लोकमान्य टिळक टर्मिनस-गोरखपुर आणि लोकमान्य टिळक टर्मिनस- करमाळी तेजस एक्सप्रेस पाचव्या मार्गावरुन चालविण्यात येणार आहे.

(हेही वाचा :Dada Bhuse : कांद्याचे भाव वाढले; मंत्री दादा भुसेंचे वादग्रस्त विधान; म्हणाले…)

मुंबईत येणाऱ्या हावडा -मुंबई एक्सप्रेस, आदिलाबाद-मुंबई नंदिग्राम एक्सप्रेस, चैन्नई- मुंबई एक्सप्रेस आणि पुडुचेरी -दादर एक्सप्रेस सहाव्या मार्गावरुन चालविण्यात येणार आहे. त्यामुळे या गाड्या आपल्या नियोजित वेळेपेक्षा १० ते १५ मिनिटे उशिराने धावणार आहेत. याशिवाय मुंबईतून जाणाऱ्या मुंबई- मडगाव, लोकमान्य टिळक टर्मिनस- पाटलीपुत्र एक्सप्रेस, दादर-सावंतवाडी एक्सप्रेस, लोकमान्य टिळक टर्मिनस-पुरी एक्सप्रेस, लोकमान्य टिळक टर्मिनस-गोरखपुर आणि लोकमान्य टिळक टर्मिनस- करमाळी तेजस एक्सप्रेस पाचव्या मार्गावरुन चालविण्यात येणार आहे.

दोन लोकल रद्द
बुधवारी रात्री ९ वाजून ५४ मिनिटांनी सीएसएमटी स्थानकातून सुटणारी १५ डब्बा कल्याण लोकल आणि कल्याणहुन रात्री ११.०५ वाजता सुटणारी सीएसएमटी १५ डब्बा लोकल रद्द केली आहे.

हेही पहा – 

 

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.