Khar Subway आणि वांद्रे रेल्वे टर्मिनसला जोडणाऱ्या पुलांचे लवकरच बांधकाम

पश्चिम उपनगरातील खार सब वेच्या ठिकाणी पावसाळ्यात काही प्रमाणात पाणी साचत असते. त्यामुळे बऱ्याचदा पावसाळ्यात वाहतूक कोंडीची समस्या निर्माण होत असते. मात्र, त्याबरोबरच खार पश्चिम आणि पूर्व दिशेकडून जाण्यासाठी हा एकच भुयारी वाहतूक मार्ग असल्याने बऱ्याचदा या परिसरातील वाहन चालकांना तासनतास रस्त्यात अडकून पडावे लागते.

811
Khar Subway आणि वांद्रे रेल्वे टर्मिनसला जोडणाऱ्या पुलांचे लवकरच बांधकाम

खार सब वेच्या (Khar Subway) ठिकाणी होणारी वाहतूक कोंडी आणि वांद्रे रेल्वे स्थानकावरुन रेल्वे टर्मिनसला जाण्यासाठी अडथळ्यांची शर्यत पार करताना लोकांची तसेच प्रवाशांची होणारी दमछाक लक्षात घेता या दोन्ही ठिकाणी आता महापालिकेच्यावतीने पूल बांधण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. त्यामुळे वांद्रे रेल्वे स्थानक ते टर्मिनस आणि खार भुयारी मार्गावर पूर्व व पश्चिम मार्ग जोडणाऱ्या पुलाचा आराखडा बनवण्यात येत असून लवकरच याची निविदा अंतिम करून प्रशासकांच्या मंजुरीने कामाला सुरुवात केली जाणार आहे. (Khar Subway)

पश्चिम उपनगरातील खार सब वेच्या (Khar Subway) ठिकाणी पावसाळ्यात काही प्रमाणात पाणी साचत असते. त्यामुळे बऱ्याचदा पावसाळ्यात वाहतूक कोंडीची समस्या निर्माण होत असते. मात्र, त्याबरोबरच खार पश्चिम आणि पूर्व दिशेकडून जाण्यासाठी हा एकच भुयारी वाहतूक मार्ग असल्याने बऱ्याचदा या परिसरातील वाहन चालकांना तासनतास रस्त्यात अडकून पडावे लागते. त्यामुळे या भुयारी वाहतूक मार्गाच्या अभावी होणारी वाहतूक कोंडी लक्षात घेता महापालिकेच्यावतीने पूर्व व पश्चिम दिशेला जोडणाऱ्या पुलाचे बांधकाम करण्याचा निर्णय घेतला आहे. याठिकाणी पूल व्हावे अशी स्थानिक लोकप्रतिनिधींसह रहिवाशांचीही मोठ्याप्रमाणात मागणी आहे, या मागणीचा विचार करता प्रशासनाने या ठिकाणी पूल बांधण्याचा निर्णय घेतला आहे, याचा आराखडा बनवून त्यांची मंजुरी प्राप्त झाल्यानंतर त्याची निविदा प्रक्रिया राबवली जाईल असे पूल विभागाच्या अधिकाऱ्यांनी स्पष्ट केले. (Khar Subway)

(हेही वाचा – Praful Patel : पंतप्रधान मोदींच्या नेतृत्वाखाली पुन्हा एनडीएचे सरकार येणार)

तसेच वांद्रे पूर्व रेल्वे स्थानकापासून ते वांद्र रेल्वे टर्मिनस दरम्यानचे अंतर जास्त असल्याने बऱ्याचदा रेल्वे प्रवाशांना टॅक्सीचा शोध घेत तसेच स्वत:च्या वाहनातून जाताना वाहतूक कोंडीअभावी अडकून पडावे लागते. बऱ्याचदा या वाहतूक कोंडीमुळे प्रवाशांची गाडीही चुकली जाते. त्यामुळे प्रवाशांची होणारी गैरसोय लक्षात घेता महापालिकेच्यावतीने रेल्वे स्थानक ते टर्मिनस दरम्यान पूल बांधण्यात येणार आहे. जेणेकरून या पुलावरून सुरळीत पणे प्रवाशांना टर्मिनसपर्यंत जाता येईल. त्यामुळे या पुलाचाही आराखडा बनवला जात असून याच्या सर्व प्रकारच्या मंजुरीनंतर लवकरच याची निविदा काढली जाईल असे पूल विभागाच्या अधिकाऱ्यांचे म्हणणे आहे. (Khar Subway)

हेही पहा –

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.