Punjab Haryana High Court: डेरा सच्चा सौदाचा प्रमुख गुरमीत राम रहिमची निर्दोष सुटका, सीबीआयने सांगितले…..

138
Punjab Haryana High Court: डेरा सच्चा सौदाचा प्रमुख गुरमीत राम रहिमची निर्दोष सुटका, सीबीआयने सांगितले.....

पंजाब आणि हरियाणा हायकोर्टाने डेरा सच्चा सौदाचा प्रमुख गुरमीत राम रहिम आणि इतर ४ जणांची रणजित सिंह हत्या प्रकरणात निर्दोष मुक्तता केली आहे. न्यायमूर्ती सुरेश्वर ठाकूर आणि न्यायमूर्ती ललिता बत्रा यांच्या खंडपीठाने मंगळवारी, (२८ मे) याबाबत निकाल दिला. (Punjab Haryana High Court)

डेरा सच्चा सौदाचा प्रमुख गुरमीत राम रहिम यांच्याव्यतिरिक्त अवतार सिंह, जसबीर सिंग, सबदिल सिंग आणि कृष्ण लाल हे या प्रकरणातील अन्य आरोपी होते. या सर्व आरोपींवर भादंविच्या कलम १२० बी सह भादंवि कलम ३०२ आणि कलम ५०६ (गुन्हेगारी धमकी) आणि कलम १२० बी अंतर्गत दोषी ठरवण्यात आले होते.

२०२१ मध्ये पंचकुलाच्या विशेष सीबीआय न्यायालयाने राम रहिम आणि इतर चौघांना जन्मठेपेची शिक्षा सुनावली होती. गुरमित राम रहिमचे वकील जतिंदर खुराणा यांनी सांगितले की, आरोपींनी शिक्षेविरोधात उच्च न्यायालयात अपिल केले होते. साक्षीदारांचे परस्परविरोधी जबाब आणि परिस्थितीजन्य पुराव्याच्या आधारे डेरा प्रमुख आणि इतर आरोपींची निर्दोष मुक्तता झाली. रणजित सिंह यांचा मुलगा जगसीर यांनी नाराजी व्यक्त करत आम्ही हा पराभव स्वीकारणार नाही, असे म्हटले आहे. (Punjab Haryana High Court)

(हेही वाचा – निबंध भोवणार! Pune Porsche Car Accident प्रकरणी बाल न्याय मंडळाच्या सदस्यांची चौकशी होणार )

निर्दोष सुटला तरी…
दोन साध्वींवर बलात्कार केल्याप्रकरणी राम रहिम २०१७ पासून रोहतक तुरुंगात २० वर्षांची शिक्षा भोगत होता. या शिक्षेनंतर पत्रकार रामचंद्र छत्रपती हत्या प्रकरणात राम रहिमला जन्मठेपेची शिक्षा भोगावी लागणार आहे. या प्रकरणामध्ये निर्दोष सुटला, तरी तुरुंगातून बाहेर पडू शकणार नाही. (Punjab Haryana High Court)

सीबीआयच्या आरोपपत्रानुसार,
उच्च न्यायलयाच्या निर्णयाविरोधात सर्वोच्च न्यायालयात दाद मागणार असल्याचे सिंह यांच्या मुलाने म्हटले आहे. कुरुक्षेत्रचे रणजित सिंह हे सिरसा कॅम्पचे व्यवस्थापक होते. सीबीआयच्या आरोपपत्रानुसार, डेरातील साध्वींच्या लैंगिक शोषणाच्या प्रकरणात रणजित सिंह यांनी साध्वींनी लिहिलेली कविता, निनावी पत्रे वेगवेगळ्या ठिकाणी वितरित केल्याचा राम रहिमला संशय होता. हीच पत्रे एका वृत्तपत्रात प्रकाशित करण्यात आली होती. यामुळे पत्रकार रामचंद्र छत्रपती यांच्यावर गोळीबार करण्यात आला. २१ नोव्हेंबर २००२ मध्ये त्यांचा तुरुंगातच मृत्यू झाला. राम रहिमने रणजित सिंह यांची १० जुलै २००२ मध्ये गोळ्या झाडून हत्या केली. राम रहिमचा चालक खट्टा सिंग याच्या जबानीवरून या हत्या प्रकरणात नंतर राम रहिमचे नाव समाविष्ट करण्यात आले.

हेही पहा – 

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.