Pranab Mukherjee : सोनिया मला पंतप्रधान बनवणार नाहीत; प्रणव मुखर्जींनी २००४ मध्ये कन्येकडे व्यक्त केली होती भावना

प्रणवदांच्या जीवनावर प्रकाश टाकणारे, त्यांच्या आठवणींना उजाळा देणारे शर्मिष्ठा यांचे पुस्तक “इन प्रणब, माय फादर; ए डॉटर रिमेम्बर्स” लवकरच प्रकाशित होणार आहे.

183
Pranab Mukherjee : सोनिया मला पंतप्रधान बनवणार नाहीत; प्रणव मुखर्जींनी २००४ मध्ये कन्येकडे व्यक्त केली होती भावना
Pranab Mukherjee : सोनिया मला पंतप्रधान बनवणार नाहीत; प्रणव मुखर्जींनी २००४ मध्ये कन्येकडे व्यक्त केली होती भावना
  • वंदना बर्वे

माजी राष्ट्रपती दिवंगत प्रणव मुखर्जी (Pranab Mukherjee) हे २००४ यावर्षीं पंतप्रधानपदाच्या शर्यतीत होते. त्या पदाविषयीचा निर्णय होण्याआधी त्यांच्या कन्या शर्मिष्ठा (Sharmistha) यांच्याशी संवाद साधला. त्या संवादावेळी काँग्रेसच्या तत्कालीन अध्यक्षा सोनिया गांधी (Sonia Gandhi) मला पंतप्रधान बनवणार नाहीत, अशी भावना प्रणवदांनी कन्येकडे व्यक्त केली होती. (Pranab Mukherjee)

प्रणवदांच्या जीवनावर प्रकाश टाकणारे, त्यांच्या आठवणींना उजाळा देणारे शर्मिष्ठा (Sharmistha) यांचे पुस्तक “इन प्रणब, माय फादर; ए डॉटर रिमेम्बर्स” (In Pranab, My Father; A Daughter Remembers) लवकरच प्रकाशित होणार आहे. त्यामध्ये संबंधित संवादाचा समावेश करण्यात आला आहे. देशात २००४ मध्ये झालेल्या लोकसभा निवडणुकीत काँग्रेसच्या नेतृत्वाखालील आघाडीची सरशी झाली. त्यामुळे पंतप्रधानपदासाठी सर्वांत मोठ्या पक्षाच्या अध्यक्षा म्हणून सोनिया गांधी (Sonia Gandhi) यांचे नाव पुढे आले होते. मात्र सोनियांनी पंतप्रधान न बनण्याचा ठाम निर्णय घेतला होता. त्यानंतर प्रणवदा आणि ज्येष्ठ नेते मनमोहन सिंग (manmohan singh) यांची नावे शर्यतीत आली. (Pranab Mukherjee)

(हेही वाचा – Rafael Nadal on Comeback : राफेल नदाल पुनरागमनासाठी तयार, पण आव्हान खडतर असल्याची कबुली)

त्यावेळच्या राजकीय घडामोडींमुळे प्रणवदा खुप व्यस्त होते. साहजिकच, त्यांची किमान दोन दिवस कन्येशी प्रत्यक्ष भेट झाली नाही. त्यामुळे शर्मिष्ठा (Sharmistha) यांनी कुतुहलापोटी प्रश्न विचारला. त्यावर तशी शक्यता नसल्याचे सांगत प्रणवदांनी पंतप्रधानपदाची माळ मनमोहन यांच्या गळ्यात पडण्याची शक्यता सुचित केली. त्यांचे शब्द खरेही ठरले. सोनियांचा विश्वास जिंकण्याबाबत ते क्रमांक एक चे व्यक्ती ठरु शकले नव्हते, असे निरीक्षण शर्मिष्ठा (Sharmistha) यांना पुस्तकामध्ये नोंदवले आहे. प्रणवदांच्या कन्या काँग्रेसच्या माजी प्रवक्त्या आहेत. (Pranab Mukherjee)

हेही पहा –

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.