सोलापूरात ओमायक्रॉनची धास्ती! रुग्णालयात ३०० आयसीयू बेड तयार

95

कोरोनाचा नवा व्हेरियंट ओमायक्रॉनच्या पार्श्वभूमीवर आंतरराष्ट्रीय प्रवास, क्वॉरंटाईन नियम तसेच ३१ डिसेंबरसाठीही शासनाकडून विशेष नियमावली जाहीर करण्यात आली आहे. राज्यातही ओमिक्रॉनचा वाढता प्रभाव पाहता आरोग्य मंत्रालयाकडून खबरदारीच्या उपाययोजना राबवल्या जात आहेत.

नागरिकांनी घाबरून जाऊ नये

ओमायक्रॉनचे रुग्ण लातूरपाठोपाठ उस्मानाबादेतही सापडल्याने सोलापूर शहर आणि जिल्ह्यात प्रशासन सज्ज झाले असून, छत्रपती शिवाजी महाराज सर्वोपचार रुग्णालयात (सिव्हिल हॉस्पिटल) ३०० आयसीयू बेड तयार ठेवण्यात आले आहेत. नागरिकांनी घाबरून जाऊ नये, असे आवाहन आरोग्य विभागातर्फे करण्यात आले आहे.

( हेही वाचा : “महाराष्ट्राची भूमी ही सहकारासाठी काशी एवढीच पवित्र” )

प्रशासनाकडून आवाहन

लातूरनंतर उस्मानाबादेत बुधवारी  दोन रुग्ण आढळले. त्यामुळे आता ओमायक्रॉनचा आपल्या जिल्ह्यात शिरकाव होऊ नये यासाठी प्रशासन सज्ज झाले आहे. लागणारी औषधे, लसींचा पुरवठा व्हावा म्हणून बैठक घेण्यात आली. यामध्ये नागरिकांनी काळजी घ्यावी, लसींचे दोन डोस घ्यावेत, असे आवाहन करण्यात आले आहे. डिसेंबर महिन्यात साडेसहा लाख लोकांनी लस घेतली आहे. तरीही सुरक्षेच्या दृष्टीकोनातून नागरिकांनी सुरक्षित अंतर ठेवावे, सार्वजनिक ठिकाणी सतत मास्क लावावेत, हात धुवावेत, मास्क वापरावेत, असे आवाहन प्रशासनाकडून करण्यात आले आहे.

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.