Smart Card : नाशिकच्या आरटीओ कार्यालयात होणारी स्मार्ट कार्ड छपाई बंद

प्रादेशिक, उपप्रादेशिक परिवहन कार्यालयांमध्ये स्मार्ट कार्ड छपाई

81
Smart Card : नाशिकच्या आरटीओ कार्यालयात होणारी स्मार्ट कार्ड छपाई बंद
Smart Card : नाशिकच्या आरटीओ कार्यालयात होणारी स्मार्ट कार्ड छपाई बंद

नाशिकच्या आरटीओ कार्यालयात होणारी स्मार्ट कार्ड छपाई बंद करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. प्रादेशिक परिवहन कार्यालयांमध्ये दोन महिन्यांपासू स्मार्ट कार्डचा तुटवडा असल्यामुळे वाहन नोंदणी कार्ड (आरसी बुक), नवीन चालक अनुज्ञप्तीचे (लायसन्स) चार हजारांपासून अधिक अर्ज प्रलंबित आहेत. सध्या फक्त मुंबई, छत्रपती संभाजीनगर आणि नागपूर येथील आरटीओ कार्यालयांतून छपाई करण्यात येईल. त्यामुळे नाशिकसह राज्यभरातील वाहन नोंदणी आणि चालक अनुज्ञप्तीच्या प्रलंबित अर्जांची छपाई करण्यात येईल.

नाशिकसह राज्यभरातील वाहन नोंदणी आणि चालक अनुज्ञप्तीच्या प्रलंबित अर्जांची संख्या आणखी वाढेल त्यामुळे संबंधितांना प्रतिक्षा करावी लागण्याची शक्यता आहे. प्रादेशिक, उपप्रादेशिक परिवहन कार्यालयांमध्ये स्मार्ट कार्ड छपाईस शासनाने 2006 पासून सुरुवात केली.ती आजतागायत सुरू होती. रोझमार्टा कंपनीत आरसी बुक आणि युनायटेड टेलिकॉम लिमिटेड कंपनीकडे स्मार्ट कार्ड वाहन परवाना छपाईचे काम दिले होते, पण आता तीन शहरांमधील आरटीओ कार्यालयामध्येच छपाई करण्यात येणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे.

(हेही वाचा – Political Parties Financial Report : देशातील 8 पक्षांच्या संपत्तीत वर्षभरात 1531 कोटींची वाढ )

त्यामुळे लायसन्समध्ये बदल वा दुरुस्ती असल्यास वाहनचालकांना आता स्मार्ट कार्ड कुठे प्रिंट झाले हे समजण्याबाबत अडचणी वाढण्याची शक्यता आहे. स्थानिक आरटीओ कार्यालयातून होणारी स्मार्ट कार्ड छपाई आता बंद केली आहे. ती फक्त मुंबई, संभाजीनगर आणि नागपूर या तीन आरटीओ कार्यालयांतच होईल, असे आदेश शासनाकडून देण्यात आले आहेत.

हेही पहा – 

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.