Congress leaders किरण चौधरी आणि श्रुती चौधरी यांची कॉंग्रेसला सोडचिठ्ठी

163
Congress leaders किरण चौधरी आणि श्रुती चौधरी यांची कॉंग्रेसला सोडचिठ्ठी

हरियाणा कॉंग्रेसचे ज्येष्ठ नेते आणि आमदार किरण चौधरी आणि त्यांची मुलगी आणि माजी खासदार श्रुती चौधरी यांनी कॉंग्रेस पक्ष सदस्यत्वाचा राजीनामा दिला आहे. दोघांनीही आपला राजीनामा कॉंग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांच्याकडे सुपूर्द केला आहे. ( Congress leaders )

हरियाणामध्ये काही महिन्यांतच विधानसभेची निवडणूक होणार आहे. यादरम्यान कॉंग्रेसचे किरण चौधरी यांनी पक्षाला सोडचिठ्ठी दिल्यामुळे अडचणीत वाढ होण्याची शक्यता असल्याची चर्चा आहे. याशिवाय ज्येष्ठ नेते किरण चौधरी आणि श्रुती चौधरी बुधवारी, (१९ जून) भाजपामध्ये प्रवेश करणार, अशी माहितीही समोर आली आहे.

हेही पहा – 

Join Our WhatsApp Community

Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.