Sitars Tanpuras GI Tags: मिरज शहरात बनवलेल्या सतार, तानपुरा वाद्यांना मिळाला जीआय टॅग

याबाबत मिरज म्युझिकल इन्स्ट्रुमेंट्स क्लस्टरचे अध्यक्ष मोहसीन मिराजकर म्हणाले, मिरज म्युझिकल इन्स्ट्रुमेंट्स क्लस्टर शहरातील सतार आणि तानपुरा या दोन्ही निर्मात्यांसाठी सर्वोच्च संस्था म्हणून काम करते.

127
Sitars Tanpuras GI Tags: मिरज शहरात बनवलेल्या सतार, तानपुरा वाद्यांना मिळाला जीआय टॅग

महाराष्ट्रातील सांगली जिल्ह्यातील मिरज हे शहर सतार आणि तानपुरा बनवण्यासाठी प्रसिद्ध आहे. गायनासाठी वापरली जाणारी ही पारंपरिक वाद्ये तयार करणारे अनेक कारागिर या शहरात राहतात. ही वाद्ये बनवण्यासाठी आता या मिरज शहराला भौगोलिक मानांकन प्राप्त झाले आहे. (Sitars Tanpuras GI Tags)

जी. आय. टॅग अर्थात भौगोलिक मानांकनामुळे आता येथे बनवली जाणारी सतार आणि तानपुरा या वाद्यांचे व्यावसायिक मूल्य वाढायला मदत होणार आहे. मिरजमध्ये सतार आणि तानपुरा बनवण्याची परंपरा ३०० वर्षांहून अधिक जुनी आहे. येथील कारागिरांच्या म्हणण्यानुसार, ७ पिढ्यांहून अधिक कारागिरांनी ही तार वाद्ये तयार करण्यासाठी काम केले आहे. ३० मार्चला बौद्धिक संपदा कार्यालयाने मिराज म्युझिकल इन्स्ट्रुमेंट्स क्लस्टरला येथे तयार केली जाणार सतार आणि तानपुरा या सांगितिक वाद्यांसाठी सोलट्यून म्युझिकल इन्स्ट्रुमेंट प्रोड्युसर फर्मला जी. आय. टॅग जारी केला.

याबाबत मिरज म्युझिकल इन्स्ट्रुमेंट्स क्लस्टरचे अध्यक्ष मोहसीन मिराजकर म्हणाले, मिरज म्युझिकल इन्स्ट्रुमेंट्स क्लस्टर शहरातील सतार आणि तानपुरा या दोन्ही निर्मात्यांसाठी सर्वोच्च संस्था म्हणून काम करते. संस्थेचा एक भाग म्हणून सतार आणि तानपुरासह ४५०हून अधिक कारागीर वाद्यांच्या निर्मितीमध्ये गुंतलेले आहेत, अशी माहिती त्यांनी पीटीआय या वृत्तवाहिनीला दिली. (Sitars Tanpuras GI Tags)

(हेही वाचा – Amol Kirtikar ED Summons: अमोल किर्तीकर यांना खिचडी घोटाळाप्रकरणी ईडीकडून पुन्हा समन्स)

…जीआय मानांकनासाठी अर्ज का केला?
मिरजमध्ये बनवलेल्या सतार आणि तानपुरांना मोठी मागणी आहे, जी स्थानिक पातळीवर उपलब्ध असलेल्या मर्यादित वाद्यांमुळे पूर्ण होऊ शकत नाही. त्यामुळे देशाच्या इतर अनेक भागांतील वाद्ये अनेकदा मिरजमध्ये तयार केली असल्याच्या नावाखाली विकली जातात किंवा काही कलाकार ही वाद्ये खास मिरजमधील कारागिरांकडून तयार करून घेतात, असा दावाही त्यांनी केला आहे. जेव्हा आम्हाला या उत्पादनांबद्दल तक्रारी येऊ लागल्या, तेव्हा आम्ही जी. आय. टॅग मिळवण्याचा निर्णय घेतला आणि २०२१ मध्ये त्यासाठी अर्ज केला, असे मिराजकर म्हणाले.

सुप्रिसद्ध कलाकारांचीही मिरजमधील सतार आणि तानपुराला मागणी
सितार आणि तानपुरा बनवण्यासाठीचे लाकूड कर्नाटकातील जंगलातून खरेदी केले जाते, तर तानपुरा तयार करण्यासाठी भोपळा हा महाराष्ट्रातील सोलापूर जिल्ह्यातील मंगलवेधा भागातून घेतले जातात, असे ते म्हणाले. “एका महिन्यात, समूह 60 ते 70 सतार आणि सुमारे 100 तानपुरा आम्ही तयार करतो”, अशी माहिती मिराजकर यांनी दिली. ते म्हणाले, ऑनलाइन व्यवसायाचा वाटा सुमारे १० टक्के आहे, तर ३० ते४० टक्के किरकोळ संगीत वाद्यांच्या दुकानांमधून येतो आणि उर्वरित ५० टक्के थेट ग्राहक आहेत, ज्यात काही सुप्रसिद्ध कलाकारांचा समावेश आहे. या ग्राहकांमध्ये उस्ताद अब्दुल करीम खान साहेब, राशिद खान यांच्यासारखे शास्त्रीय गायक आणि किराणा घराण्याचे कलाकार यांचाही समावेश आहे.

हेही पहा – 

Join Our WhatsApp Community

Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.