Shri Sant Gajanan Maharaj : गजानन महाराज यांचा 146वा प्रगटदिन सोहळा; शेगावात लाखो भाविक दर्शनासाठी दाखल

187

संतश्रेष्ठ श्री गजानन महाराज (Shri Sant Gajanan Maharaj) यांचा 146 वा प्रगटदिन सोहळा शेगावात मोठ्या थाटामाटात पार पडत आहे. या सोहळ्याला 2 ते 3 लाख भाविकांनी हजेरी लावली आहे. 23 फेब्रुवारीपासूनच या सोहळ्याला सुरुवात झाली होती. त्यामुळे गजानन महाराजांच्या भक्तांच्या गर्दीने शेगाव फुलून गेले. देशभरातून लाखो भाविक तसेच शेकडो दिंड्या गजानन गण गण गणात बोते असा नामघोष करत शेगावात दाखल झाल्या. दरम्यान, रविवार, ३ मार्च रोजी संत गजानन महराजांच्या पालखीची वाजत गाजत मिरवणूक काढण्यात येणार आहे. शेगावात चैतन्याचे वातावरण निर्माण झाले आहे.

संत नगरीमध्ये उत्सवाच्या निमित्ताने १ मार्च रोजी रात्रीपर्यंत राज्यभरातून सहाशेच्यावर भजनी दिंड्यांचे आगमन झाले आहे. दरम्यान भाविकांची मोठी गर्दी व सुविधा लक्षात घेता गजानन महाराज मंदिर (Shri Sant Gajanan Maharaj) २ व ३ मार्चला रात्रभर खुले राहणार आहे. टाळ मृदंगाच्या गजराने विदर्भपंढरी शेगाव नगरी दुमदुमून जात आहे. संस्थानकडून विसावा भक्त निवास संकुल परिसरात तंबू उभारून या भजनी दिंड्यांची नोंदणी तसेच नियमांची पूर्तता करणाऱ्या भजनी दिंड्यांना दहा टाळ, एक मृदंग, एक विना, एक हातोडी, सहा माऊली पताका भजनी साहित्य व श्री ज्ञानेश्वरी, श्री तुकाराम गाथा, श्री एकनाथ भागवत साहित्य वितरण केले जात आहे. भजनी दिंडीमधील सर्व वारकरी भाविक भक्तांची सर्व व्यवस्था तसेच त्यांना महाप्रसाद वितरण श्री संस्थानकडून करण्यात येत आहे.

(हेही वाचा Lok Sabha Election 2024: एकाही लोकसभा नेत्याचा यादीत समावेश नसला, तरी महाराष्ट्रातील ‘या’ माजी मंत्र्यांना यूपीतून BJPची उमेदवारी, जाणून घ्या …)

कसा होणार प्रकट दिन?

३ मार्च रोजी श्रींचे मंदिरामध्ये सकाळी १० वाजता या महारुद्रस्वाहाकार यांगाची पूर्णाहुती होईल. नंतर १० ते १२ श्रींचे शेगावी प्रकटनिमित्त कीर्तन पार पडेल. दुपारी ४ वाजता श्रींची पालखी परिक्रमा मंदिर मधून शहरातील परिक्रमा मार्गाने निघेल. सायंकाळी ही परिक्रमा संपवून पालखी परत मंदिरात पोहोचेल. मंदिरात महाआरती व वारकऱ्यांचा नयनरम्य असा रिंगण सोहळा पार पडेल. त्यानंतर पालखी परिक्रमेची सांगता होईल. दुसऱ्या दिवशी ४ मार्च रोजी सकाळी ७ ते ८ काल्याचे किर्तनाने श्रींच्या (Shri Sant Gajanan Maharaj) प्रकट दिन उत्सवाची सांगता होईल.

 

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.