Shri Trimbakeshwar Temple : “…अन्यथा महाराष्ट्रातील सर्व मंदिरं दोन दिवस बंद ठेवू” – हिंदू महासंघाचा इशारा

हिंदुस्थानचे राष्ट्रगीत नाकारणाऱ्यांनी त्र्यंबकेश्वर (Shri Trimbakeshwar Temple) मंदिरात बळजबरीने घुसण्याचा प्रयत्न केला. त्यामुळेच आम्ही गोमूत्र शिंपडून शुद्धीकरण केले आहे.

202
Shri Trimbakeshwar Temple
Shri Trimbakeshwar Temple : "...अन्यथा महाराष्ट्रातील सर्व मंदिरं दोन दिवस बंद ठेवू" - हिंदू महासंघाचा इशारा

श्री त्र्यंबकेश्वर मंदिरात (Shri Trimbakeshwar Temple) मुसलमानांनी स्थानिक संदल निमित्ताने काढलेल्या मिरवणुकीच्या वेळी मंदिरात जबरदस्तीने आत घुसण्याचा प्रयत्न केला. त्यावेळी सुरक्षा रक्षकांनी त्यांना अडवले आणि तेव्हा वाद निर्माण झाला. यानंतर या विषयावर राज्यभर चर्चा सुरू झाली. मंदिर प्रशासनाने तात्काळ पोलिसांना पत्र लिहिले. ज्यामध्ये मुसलमानांचा मंदिरात घुसण्याचा प्रयत्न हा सामाजिक सलोखा बिघडवण्यासाठी होता, असा आरोप केला आहे. त्यांनतर हिंदू महासंघ यांच्याकडून मंदिराच्या मुख्य प्रवेशद्वाराचं शुद्धीकरण करण्यात आलं.

(हेही वाचा – Shri Trimbakeshwar Temple : त्र्यंबकेश्वर मुख्य प्रवेशद्वाराचं हिंदू महासंघ करणार शुद्धीकरण)

त्र्यंबकेश्वर मुख्य प्रवेशद्वाराचं शुद्धीकरण

बुधवार १७ मे रोजी सकाळी हिंदू महासभा, ब्राह्मण महासंघ, नाशिक पुरोहित संघ, त्र्यंबकेश्वर पुरोहित संघ यासह वेगवेगळ्या हिंदू संघटनांचे प्रतिनिधी त्र्यंबकेश्वरमध्ये (Shri Trimbakeshwar Temple) दाखल झाले. त्र्यंबकेश्वर मंदिरात शिरून गुलाब पाणी, गोमुत्राचा वापर करून शुद्धिकरण केले. यावेळी हर हर महादेव असा जयघोष करण्यात आला. अनेकांनी भगवे वस्त्र, भगव्या टोप्या घालून हिंदू धर्म की जय यासह इतर घोषणा दिल्या. मंदिर शुद्धिकरणाच्या पूजेनंतर महाआरती करण्यात आली. दरम्यान, कुठलाही अनुचित प्रकार घडू नये यासाठी पोलिसांनी मोठ्या प्रमाणावर बंदोबस्त तैनात केला होता. अशातच हिंदू महासंघाचे अध्यक्ष आनंद दवे यांनी एक इशारा दिला आहे.

हेही पहा – 

काय म्हणाले आनंद दवे?

मंदिरात (Shri Trimbakeshwar Temple) जे घडलं तो जिहादचाच एक भाग होता. घुसखोरी करणाऱ्यांवर येत्या ७२ तासांत कारवाई झाली नाही तर आम्ही महाराष्ट्रातील सर्व मंदिर दोन दिवस बंद ठेवू, असा इशारा आनंद दवे यांनी दिला आहे. तसेच हिंदुस्थानचे राष्ट्रगीत नाकारणाऱ्यांनी त्र्यंबकेश्वर (Shri Trimbakeshwar Temple) मंदिरात बळजबरीने घुसण्याचा प्रयत्न केला. त्यामुळेच आम्ही गोमूत्र शिंपडून शुद्धीकरण केले आहे. त्र्यंबकेश्वर ज्योतिर्लिंग हे सर्वांचेच श्रद्धास्थान आहे. सर्वजण येथे दर्शनासाठी येत असतात. मात्र, इतर धर्मियांनी चादर चढवणे यासारखी कोणतीही परंपरा येथे नाही.

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.