Shraddha Walker Murder Case : श्रद्धाचे ३५ तुकडे करूनही आफताब म्हणतो ‘मला गुन्हा अमान्य’

काही तुकडे त्याने ग्राईंडरमध्ये बारीक केले होते आणि हत्येचा पुरावा नष्ट करण्याचा प्रयत्न केला.

229
Shraddha Walker Case : श्रद्धाचे ३५ तुकडे करूनही आफताब म्हणतो 'मला गुन्हा अमान्य'

आफताबने मागच्या वर्षी म्हणजे १८ मे २०२२ ला श्रद्धाची गळा (Shraddha Walker Murder Case) दाबून हत्या केली. त्यानंतर तिच्या मृतदेहाचे तुकडे केले. हे तुकडे त्याने दिल्लीच्या महारौलीच्या जंगलात आणि इतर भागांमध्ये फेकले होते. काही तुकडे त्याने ग्राईंडरमध्ये बारीक केले होते आणि हत्येचा पुरावा नष्ट करण्याचा प्रयत्न केला. त्यानंतर त्याला दिल्ली पोलिसांकडून अटक करण्यात आली.

(हेही वाचा – दिल्लीत घडले आणखी एक श्रद्धा वालकरसारखे हत्याकांड )

पोलिसांच्या चौकशीदरम्यान त्याने स्वतः आपल्या गुन्ह्याची (Shraddha Walker Murder Case) कबुली दिली होती. मात्र आता त्याने हे आरोप फेटाळून लावले आहेत.

नेमकं प्रकरण काय?

श्रद्धा वालकर हत्याकांड (Shraddha Walker Murder Case) प्रकरणात आरोपी आफताब पूनावालाच्या विरोधात दिल्लीच्या साकेत न्यायालयाने भारतीय दंड संहिता कलम ३०२ अंतर्गत हत्येचा गुन्हा निश्चित केला आहे. तसेच कलम २०१ अंतर्गत गुन्ह्याचे पुरावे नष्ट करण्याचाही आरोप निश्चित केला आहे. दिल्लीतल्या साकेत न्यायालयाने आफताबवर आरोप निश्चित केले. आफताबच्या विरोधात हत्येचा आणि हत्या केल्यानंतर पुरावे नष्ट केल्याचा खटला चालणार आहे. अशात आफताबने हे आरोप फेटाळले आहेत आणि मी खटल्याला सामोरे जाईन असे म्हटले आहे.

हेही पहा – 

न्यायालयाने श्रद्धाचे (Shraddha Walker Murder Case) वडील विकास वालकर यांच्या एका याचिकेला ९ तारखेपर्यंत स्थगिती दिली होती. या याचिकेत विकास वालकर यांनी असं म्हटलं होतं की माझ्या मुलीच्या मृतदेहाचे अवशेष मला द्या मला त्यावर परंपरेप्रमाणे अंत्यसंस्कार करायचे आहेत. मात्र ९ मेपर्यंत या याचिकेला स्थगिती देण्यात आली आहे. आफताब पूनावालावर पोलिसांनी आयपीसी कलम ३०२ आणि कलम २०१ अंतर्गत आरोप निश्चित केले आहेत.

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.