दिल्लीत घडले आणखी एक श्रद्धा वालकरसारखे हत्याकांड 

130

दिल्लीत धर्मांध मुसलमान आफताब याने हिंदू प्रेमिका श्रद्धा वालकरच्या शरीराचे ३५ तुकडे करून तिची निर्घृण हत्या केली. या घटनेने अवघा देश हादरून गेला होता, आता अशीच आणखी एक हत्याकांड घडल्याचे समोर आले आहे. या घटनेत पोलिसांना एका मुलीचा मृतदेह धाब्याच्या फ्रिजमध्ये सापडला. पोलिसांनी आरोपीला अटक करून मृतदेह ताब्यात घेतला.

पोलिसांनी फ्रिजमधून मुलीचा मृतदेह बाहेर काढला

या प्रकरणी दिल्लीतील बाबा हरिदास नगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या घटनेने परिसरात एकच खळबळ उडाली असून पोलीस अधिक तपास करत आहेत. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, साहिल गहलोत (२६) असे आरोपीचे नाव आहे. या प्रकरणी आता आरोपीची चौकशी सुरू आहे. मुलीची हत्या केल्यानंतर आरोपींनी मृतदेह ढाब्याच्या फ्रिजमध्ये लपवून ठेवला होता. पोलिसांनी फ्रिजमधून मुलीचा मृतदेह बाहेर काढला आहे. कश्मीरी गेट आयएसबीटीजवळ कारमध्ये मुलीची गळा आवळून हत्या करण्यात आली. आरोपीने यानंतर मृतदेह गावातील ढाब्याच्या फ्रिझमध्ये लपवून ठेवला. याआधी दिल्लीतील श्रद्धा हत्याकांडाने संपूर्ण देश हादरला होता. आफताबनेही गेल्या वर्षी 18 मे रोजी श्रद्धाचा गळा दाबून खून केला होता. यानंतर मृतदेहाचे 35 तुकडे करण्यात आले. मृतदेह ठेवण्यासाठी आफताबने फ्रीज विकत घेतला होता.

(हेही वाचा सीझनच्या आधीच मुंबईत हापूस आंब्याची विक्रमी आवक)

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.