Nuh Violence : हरियाणात हिंसा घडवणाऱ्यांची दुकाने पाडली; 6 दिवसांत 216 जण अटकेत

87

जातीय हिंसाचारानंतर सलग तिसऱ्या दिवशी बेकायदा बांधकामे आणि अतिक्रमणांवर सरकारी बुलडोझर चालवण्यात आला. नल्हार रोडवरील सुमारे अडीच एकर जागेवर बेकायदेशीरपणे बांधलेली 45 दुकाने शनिवारी प्रशासनाने पाडली. ज्यांची बेकायदा बांधकामे पाडण्यात आली.

कोणताही अनुचित प्रकार घडू नये यासाठी मोठा पोलीस बंदोबस्तही तैनात करण्यात आला होता. नूहचे एसडीएम अश्वनी कुमार यांनी सांगितले की, मुख्यमंत्री मनोहर लाल यांच्या सूचनेनुसार ही कारवाई करण्यात आली आहे. येथे राहणाऱ्या लोकांना आधी नोटीस देण्यात आली. अडबार चौक ते तिरंगा चौकापर्यंतचे अतिक्रमण हटवण्यात आल्याचे एका पोलीस अधिकाऱ्याने सांगितले. 31 जुलै रोजी या ठिकाणी हिंसाचार झाला होता. गुरुवारी, नूह जिल्ह्यातील तावडू शहरात रोहिंग्या घुसखोरांच्या 250 झोपड्या पाडण्यात आल्या, तर शुक्रवारी नल्हार मंदिराभोवतीची बेकायदेशीर बांधकामेही पाडण्यात आली. दुसरीकडे हिंसाचाराच्या सहा दिवसानंतरही पोलिसांची कारवाई सुरूच आहे. आतापर्यंत 104 एफआयआर नोंदवण्यात आले असून 216 आरोपींना अटक करण्यात आली आहे, तर आणखी 88 जणांना ताब्यात घेण्यात आले असून त्यांची चौकशी सुरू आहे. सोशल मीडियावर अफवा पसरवणाऱ्या 10 जणांना अटक करण्यात आली आहे.

(हेही वाचा Leopard : बिबट्याने नवऱ्याची मान पकडली; वाघीण बनत पत्नी लढली; पतीची सुखरूप सुटका)

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.