Share Market: मोदींच्या भाषणाचा शेअर मार्केटवर परिणाम, सरकारी शेअर्सची २४ लाख कोटींची कमाई, कारण? वाचा सविस्तर…

६ महिन्यांपूर्वी सरकारी कंपनीच्या शेअरचा भाव १८७६ रुपये होता. तो आता २९३३ रुपयांपर्यंत वाढला आहे.

234
Share Market: मोदींच्या भाषणाचा शेअर मार्केटवर परिणाम, सरकारी शेअर्सची २४ लाख कोटींची कमाई, कारण? वाचा सविस्तर...
Share Market: मोदींच्या भाषणाचा शेअर मार्केटवर परिणाम, सरकारी शेअर्सची २४ लाख कोटींची कमाई, कारण? वाचा सविस्तर...

पंतप्रधान नरेंद्र मोदी संसदेच्या सभागृहात बुधवारी भाषण झाले. याआधी ६ महिन्यांपूर्वी मोदींनी केलेल्या २ तासांच्या भाषणात शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करणाऱ्या लोकांना सरकारी शेअरमध्ये (Share Market) (government shares) गुंतवणूक करण्याचा सल्ला दिला होता. यामुळे शेअर मार्केटमध्ये सरकारी शेअरमध्ये जोरदार तेजी आली.

सरकारी शेअर्समध्ये (government shares) झपाट्याने वाढ झाली. ज्या सरकारी कंपन्या लोकं म्हणतील त्या बंद होतील, त्यामध्ये पीएम मोदींनी तुम्ही त्यांच्यात गुंतवणूक करायला सुरुवात कराल, तर श्रीमंत व्हाल, असं सांगितलं होतं. त्यावेळी मोदींनी देशातील सर्वात मोठ्या विमा कंपन्या एलआयसी आणि एचएएल या कंपन्यांची नावे घेतली होती. एलआयसीचा हिस्सा ६ महिन्यांपूर्वी फक्त ६५५ रुपये होता, जो आता १०२९ रुपयांवर पोहोचला आहे. म्हणजे ६ महिन्यांत तब्बल ५७ टक्के परतावा दिला.

(हेही वाचा – Sharad Pawar : राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार; शरद पवारांच्या पक्षाला नाव मिळाले )

गुंतवणूकदाराला लाखो रुपयांचा फायदा…

हिंदुस्थान एरोनॉटिक्स लिमिटेड कंपनीने गेल्या ६ महिन्यांत गुंतवणूकदारांना ५६.३७ टक्के मजबूत परतावा दिला. ६ महिन्यांपूर्वी सरकारी कंपनीच्या शेअरचा भाव १८७६ रुपये होता. तो आता २९३३ रुपयांपर्यंत वाढला आहे. याचा अर्थ गुंतवणूकदारांना एका शेअरमधून १००० रुपयांपेक्षा जास्त नफा मिळाला आहे. अशा स्थितीत या शेअरमध्ये लाखो रुपयांची गुंतवणूक करणाऱ्या गुंतवणूकदाराला लाखो रुपयांचा फायदा झाला तसेच एलआयसी आणि एचएएल व्यतिरिक्त एक-दोन नव्हे, तर ५६ सरकारी कंपन्यांमध्ये गेल्या ६ महिन्यांत ६६ टक्क्यांनी वाढ झाली आहे. यामध्ये रेल विकास निगम, IC, MMTC,NDMC, सेंट्रल बँक, UCO बँक, IRCON, NHPC असा ५६ कंपन्यांचा समावेश आहे.

हेही पहा –

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.