Share Market: शेअर बाजारात जोरदार खरेदी, कोणते शेअर्स वधारले ? वाचा सविस्तर

निफ्टी बँक निर्देशांकात एक टक्क्यांहून अधिक वाढ झाली.

141
Share Market: गुढीपाडव्याच्या मुहूर्तावर शेअर बाजारात तेजी, सेन्सेक्सने केला ७५ हजारांचा टप्पा पार
Share Market: गुढीपाडव्याच्या मुहूर्तावर शेअर बाजारात तेजी, सेन्सेक्सने केला ७५ हजारांचा टप्पा पार

मंगळवारी बाजारातील प्रमुख निर्देशांक वाढीसह बंद झाले. यामुळे सेन्सेक्सने 482 अंकांची उसळी घेतली आणि 71,555 वर बंद झाला. निफ्टीही 127 अंकांनी वधारुन निर्देशांक 21,743 वर बंद झाला. बँकिंग, वित्तीय सेवा, तेल, गॅस, फार्मा आणि हेल्थकेअरमध्ये बाजारात सर्वाधिक खरेदी झाली.  (Share Market)

निफ्टी बँक निर्देशांकात एक टक्क्यांहून अधिक वाढ झाली. आयशर मोटर्सने चालू आर्थिक वर्षाच्या तिसऱ्या तिमाहीचे निकाल जाहीर केले असून त्यांचा करानंतरचा नफा 34 टक्क्यांनी वाढून 996 कोटी रुपयांच्या पुढे गेला आहे.

मंगळवारी शेअर बाजारात खासगी बँकिंग शेअर्समध्ये मोठी वाढ दिसून आली. सेन्सेक्स आणि निफ्टीच्या वाढीसह, निफ्टी मिडकॅप 100, बीएसई स्मॉल कॅप, निफ्टी आयटी, निफ्टी बँक, निफ्टी फार्मा, निफ्टी एफएमसीजी आणि निफ्टी फायनान्शियल सर्व्हिसेसमध्ये वाढ झाली. निफ्टी ऑटो निर्देशांक किंचित घसरणीसह बंद झाला.

(हेही वाचा – Mumbai Police : मुंबई गुन्हे शाखेच्या पोलीस उपायुक्त पदी दत्ता नलावडे; तर प्रकटीकरण-१ पदी विशाल ठाकूर)

कोणते शेअर्स वाढले?
शेअर बाजारातील टॉप गेनर्समध्ये कोल इंडिया, यूपीएल, ॲक्सिस बँक, आयसीआयसीआय बँक, एचडीएफसी लाइफ, एसबीआय लाइफ आणि विप्रोचे शेअर्स होते, तर शेअर बाजारातील सर्वाधिक नुकसान झालेल्यांमध्ये हिंदाल्को, ग्रासिम इंडस्ट्रीज, अल्ट्राटेक सिमेंट, महिंद्रा अँड महिंद्रा, Divi’s Labs, BPCL आणि Titanचे शेअर्स होते.

हेही पहा – 

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.