Ashok Chavan यांच्या भाजपमध्ये जाण्याने राज्यसभेची गणिते बदलणार

अशोक चव्हाण यांच्यासोबत काँग्रेसचे अनेक आमदार फुटून भाजपमध्ये जाण्याची शक्यता वर्तविली जात आहे. त्यामुळे येणाऱ्या राज्यसभा निवडणुकीत आता रंगत निर्माण झाली आहे. अशोक चव्हाण यांना मोठ्याप्रमाणावर काँग्रेस आमदारांचा गुप्तपणे पाठिंबा आहे.

218
Congress अद्याप अशोक चव्हाण यांच्या धक्क्यात, Mahavikas Aghadi जागावाटप विसरले
काँग्रेस पक्षाला सोडचिठ्ठी देऊन भाजपमध्ये पक्षप्रवेश केल्याने अशोक चव्हाण (Ashok Chavan) यांच्यामुळे महाराष्ट्राच्या राजकारणात नवा भूकंप झाला आहे. अशोक चव्हाण यांच्यासोबत काँग्रेसचे अनेक आमदार फुटून भाजपमध्ये जाण्याची शक्यता वर्तविली जात आहे. त्यामुळे येणाऱ्या राज्यसभा निवडणुकीत आता रंगत निर्माण झाली आहे. अशोक चव्हाण (Ashok Chavan) यांना मोठ्या प्रमाणावर काँग्रेस आमदारांचा गुप्तपणे पाठिंबा आहे. या आमदारांनी अशोक चव्हाण (Ashok Chavan) यांना फोन केला तेव्हा सांगितले की, तुमची भूमिका योग्य आहे. आमचं तुम्हाला समर्थन आहे. पण आम्हाला आता लगेच काँग्रेस पक्ष सोडता येणार नाही. आमच्यावर पक्षांतरबंदी कायद्यातंर्गत कारवाई होऊ शकते. त्यामुळे आम्ही योग्यवेळी आम्ही तुमच्यासोबत येऊ, असा संदेश या आमदारांनी अशोक चव्हाण यांना दिल्याचे समजते. (Ashok Chavan)
राज्यसभेच्या सहा जागांसाठी मतांचं गणित काय?
राज्यसभेच्या या सहा जागांसाठी प्रत्येक पक्ष मतांची जुळवाजुळव करत आहे. महाराष्ट्र विधानसभेचे २८८ सदस्य आहेत, त्यापैकी शिवसेनेचे सांगलीतील आटपाडीचे आमदार अनिल बाबर आणि भाजपचे अकोला पश्चिम गोवर्धन शर्मा या दोन आमदारांचं निधन झालं आहे. तर अशोक चव्हाण (Ashok Chavan) यांचा राजीनामा आणि नागपूरचे काँग्रेस आमदार सुनील केदार यांची आमदारकी रद्द झाली आहे. त्यामुळे २८४ आमदार उरतात भागिले रिक्त जागांची संख्या ६ + १ = ४०.५७ म्हणजे राज्यसभेच्या निवडणुकीसाठी ४०.५७ इतका मतांचा कोटा असेल. भाजपकडे स्वतःचे १०४ आणि अन्य १३ अपक्ष आमदारांची मतं आहेत. त्यानुसार भाजपच्या ३ जागा सहजपणे निवडून येऊ शकतात. तर एकनाथ शिंदेंच्या (CM Eknath Shinde) शिवसेनेकडे ३९ आमदार आणि १० अपक्षांची मतं आहेत. त्यानुसार शिवसेनेची एक जागा निवडून येऊ शकेल. काँग्रेसकडे ४५ आमदारांचं संख्याबळ आहे. त्यानुसार काँग्रेसची एक जागा निवडून येण्यास काहीही अडचण येणार नाही. परंतु अशोक चव्हाण (Ashok Chavan) भाजपमध्ये आमदार जास्त घेऊन आल्यास हे गणित मात्र बिघडू शकतं. (Ashok Chavan)
मागच्यावेळेप्रमाणे काँग्रेस आमदार क्रॉस वोटिंग करणार?
२७ फेब्रुवारी रोजी राज्यसभेसाठी मतदान होणार आहे. या निवडणुकीमध्ये काँग्रेस आमदार क्रॉस वोटिंग करण्याची दाट शक्यता वर्तवण्यात येत आहे. पक्षांतरबंदी कायद्यामुळे काँग्रेसच्या आमदारांना भाजपमध्ये सध्या तरी प्रवेश येणार नाही. त्यामुळे निवडणुकीमध्ये क्रॉस वोटिंग करण्यासाठी भाजपने मेगा प्लॅनिंग सुरु केले आहे. अनेक आमदारांनी अशोक चव्हाण (Ashok Chavan) यांना समर्थन दाखवलं आहे. मात्र पक्षांतरबंदी कायद्यामुळे लगेच अशोक चव्हाण (Ashok Chavan) यांच्यासोबत जाणं आमदारांना शक्य नाही. राज्यसभेच्या एका उमेदवाराला ४०.५७ चा कोटा ठरलेला आहे तो काँग्रेस पूर्ण करते. मात्र गुप्त मतदान असल्याने काँग्रेसचे काही आमदार क्रॉस वोटिंग करण्यासाठीचा मोठा प्लॅन सुरु करत आहे. महायुती सहापैकी पाच जागा जिंकत आहे मात्र एक जागा काँग्रेसला जाताना पाहायला मिळत आहे. क्राॅस वोटींगमुळे सहावी जागा ही महायुती जिंकण्यासाठी प्रयत्न करत आहे. (Ashok Chavan)
Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.